Home August 2021कविता Manya Joshi-कविता 

Manya Joshi-कविता 

कृती

खून झालाय

एस्टॅब्लिश झाले

कोणी केला कसा

माहिती नाहीतर

गुप्ता अंकल बी िंवग

४०७, वय जास्त कमी

विधवा सून, बायको

दोघी कामावर

गुप्ता अंकल लॅपटॉपवर

नेटफ्लिक्सवर दिवसभर

शेजारी दळवीसर

समोर करमरकर

करमरकर : आपण शकच्या दायर्‍यावर

दळवीसर : म्हणजे

करमरकर : क्लोजेस्ट नेबर, खुनाच्या वेळी, एकाच फ्लोअरवर

दळवीसर : पण मोटिव्ह?

करमरकर : शोधला की सापडेल

दळवीसर : कुछ भी.

करमरकर : प्स्स्.

कोणाला सोडतील तर ते कसले पोलीस

सगळ्या बििंल्डगवाल्यांची जबानी घेतली

जसे सगळेच खुनी किंवा अकम्प्लिस

माझा मित्र म्हणाला

तू नाही ना केलास

मग बस.

चल बसू.

आहे उसंत कुठे आता बसायला

आहे वसंत कुठे आता दिसायला

कुणी मारलं असेल गुप्ता अंकल तुम्हाला?

मी मुखवटा चढवतो हसायला

शकची सुई दोघांवर

दळवीसर आणि करमरकर

पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे

बरेच दिवस झाले

दळवीसर आणि करमरकर

सुखात आहेत

गुप्ता अंकलच्या फ्लोरवर

सोसायटीमध्ये संशय

गुप्ता अंकलची सून

शकची सुई घुसून

सून हसते, उगीच बघते,

कुछ भी.

करमरकर टेक्स्टमध्ये घुसतात

कुछ भी. कुछ भी.

दळवीसरांना सुनेबरबर

टेक्स करताना

नंगेहाथ

पकडतात

शकची सुई

अडकवतात

१०

बसायला थांबलेला मित्र

म्हणतो, जिथे खायचे

तिथे

हागायचे नसते

बोल लवकर

कधी बसायचे

११

धडधडत्या हृदयाने

मी फ्लॅटमध्ये शिरताना

आहे उसंत कुठे आता बसायला

कुछ भी करून पाहिजेच

प्रेमाला कृतीत उतरवायला

नाही येत बोलता जिथे;

देअरॉफ वन मस्ट बी सायलंट. 

घंटा

ऑस्समसीन

दादासाब आये है, अहं

ऑनलाइन कॉल फोडके

व्हॉट द फक

एॅम आय सपोज्ड टु

करकर तर

केले फॉलो

बदलले थॉट

संपवून गेले

कार्यकारण,

सार्वजनिक मुतारीला

कार्यकर्त्याचे नाव,

टाळ्या!

दादासाहेब मुतत चाललेत

विटांच्या तुकड्यांकडे बघत

इंटरपेलेटेड लघवीचा

िंचब साक्षात्कार

हेएल दादासाब!

हेल

नवीन फोन येतोय

ऑस्सम फीचर्स

घ्या दादासाहेब

सूट होणार तुम्हाला

कसा होणार सुरू

पोस्ट सेक्युलर कारभार

मुळातून मूळ

तत्त्वाचा

हातभार

हालत राहिलीये

वाजत राहिलीये

ध्वनित अर्थ

रिप्रेसिव्ह,

घंटा  –मन्या जोशी

कॉन्टॅक्ट

कावळ्याला बरोबर माहिती नाहीये

झाडाला माहित्ये का

चुत्या आहे कावळा

विकी खिडकी बंद करतो

काळोख्या झाडांत

पिवळसर व्हिस्की

ब्राऊज करतो विकी

नेटफ्लिक्सची दुनिया

अनिच्छेची िंरग वाजते

विकी फेकतो

पिझ्झाचा पाय

धडपडत उचकटतो

सोफ्याच्या फटीत

झवाडा फोन

कावळा प्रॉफेटिक

भाड्याच्या कॅबमधून

भाड्याच्या हॉस्पिटलकडे

अनिच्छेचा मामा

लिव्हरफेल्ड अवकाश

विल टु लिव्ह

आईचा भौ

वीकेंडचा भौसडा

कॅबच्या खिडकीतून

उडणारा कावळा

हसणारा कावळा

अंधारात दिसत नाही

विकी फसत नाही

क्या थकेला आरजे है

चॅनेल बदलो

बंद करो

कॅबमध्ये येतो

आयसीयूचा वास

विकी नि:श्वास

कॅबरायडर आरशात

क्या हुआ बॉस?

एक लाइफ संपली

दोन उरल्या

एक झाडांत

एक कावळ्यात

डेव्हलपर्सशी कॉण्टॅक्ट

हवाहवाच –मन्या जोशी

आमच्यावेळी

आमच्यावेळी

अहाहा

क्रिप्टो ट्रेिंडग नव्हते

काका अहाहा

आकडा लावायचे

बाबा पारायणाचे

आजी टाओ ऑफ फिजिक्स

अहाहा

ताई फेसबुकवर

सतत इन्स्टा

अहाहा

आमच्यावेळी, बॉस

आमच्यावेळी

दादाला इन्स्टंट

नोटिफिकेशन्स,

अहाहा

क्लोज करून करून

पिरपिरलेला दादा

हरारी वाच हा

माणुसकीचे नवे धडे

शिफ्ट झालेले पॅराडिम

कुहन आया कुन

आया कुन आया कुहन

आमच्यावेळी दादा

आमच्यावेळी

सोसायटीतला

कल्पेश मेहता

डुक्कर फियाट विकून

अहाहा

नवीन एसयूव्ही

जलसो छे

जलसो, भोसमारीना

आओ मारी साथे

आमच्यावेळी

मेट्रो धावणार

मेट्रो धावली

आमच्यावेळी

एसी लोकलमध्ये

शेअर रिक्षा

रिक्षात म्युझिक

अनु मलिक गातो

सोनू निगम

अहाहा

सटासट

मामा म्हणतात

गणपती भट

मला गणपती भट

आईची गांड

आमच्यावेळी

क्लायमेट करतं

अल्पवयीन मुलीवर

पाशवी चमत्कार

एन्व्हायरन्मेंटल भुरळ

आमच्यावेळी अहाहा

वोक कंझुमर्स

आय एॅम लविंग इट!

प्रागैतिक भूमीचे

रीमॉडर्न इन्स्टलेशन

चोविसाव्या हाईट्सवरून

़खुशी मारते उडी

अहाहा

बाईकवरचा पंकज

बॉक्कन थुंकतो गुटखा

आमच्यावेळी अहाहा

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमात

मिक्सड रिअ‍ॅलिटी

नवीन सगळे जुने,

विस्तारते

अहाहाहा –मन्या जोशी