ड्रीम
मी स्वप्नात आहे की, मी बिबळ्या वाघ आहे
ज्याच्यावर पडलीये जाडजूड काळी फर आणि चमकताहेत डोळे
मी तुझ्या मागे चाललोय
तू पाहतोय मागे पण
हिम्मत नाही करीत तू भरभर चालण्याची की हळूहळू चालण्याची की थांबण्याची
मला अवघडतंय या बिल्डिंगांच्या जंजाळात
लालबुंद जळणार्या डांबरामध्ये
मला अवघडायला होतंय कमी उंचीच्या घरांमुळे
घाबरलेल्या कुत्र्यांमुळे
उड्या मारत बाजूला होणार्या माणसांमुळे
तू बसतोस थकून कॅफेसमोर
जिथे मी पडलेला आहे अथांग तुझ्या पायांवर
तू वाट पाहतोय
तुला कुणीही विचारात नाहीये.
ते दूरवरून पाहताहेत आणि त्यांना वाटतेय की हा एक-एकपात्री प्रयोग आहे
कुणीतरी टाळ्या वाजवतं पण ठेवतं ते गंभीर अंतर
संध्याकाळी थकून आपण परततो घरी
तू कोणाशीच बोलला नाहीस
कुणीही दिलेलं नसतं तुला खायला-प्यायला
तुला घाबरून नुसते पाहात राहिले
मी स्वत:च्या पायांवर उठतो
उघडतो दरवाजे
तू पडू शकत नाहीस बाहेर
तू कलंडतो आणि मरणाची वाट पाहतोस
माझ्या दातांनी फाडतो मी तुझे कपडे
तू थरथरत असताना मी तुला चाटतो
सायरनचे आवाज येत असतात, कानठळ्या बसवणारा आवाज येत असतो
दरवाज्यावर
माणसांचे आवाज येत असतात मेगाफोन्सवर
टियरगॅसच्या शिट्या उडताहेत, धूर उडतोय
मी तुला मिठीत घेतो, अगदी घट्ट
तुझं रक्षण करण्यासाठी
मी गोळीबार ऐकतो …ऐकत बसतो.
फ्रयडे
शुक्रवारी आपण मरणाचा विचार करतो
म्हणूनच आपण पडतो घराबाहेर
आपल्याला खूप त्रास झालेला असतो
यातना झालेल्या असतात
मॅडनेस आलेला असतो आपल्याला
डेडएंडला पोहोचल्यासारखा मॅडनेस
आपण ठार झालेले असतो आणि
बेधुंद बेसुमार धावत असतो आपण
या क्लबपासून त्या क्लबपर्यंत
माहीत नसतं/समजतं नसतं आपल्याला की
आपण चुंबतोय कुठल्या तरी अस्पष्ट चेहर्यांना
वाटतं असतं की कुणाला तरी घरी घेऊन जावं
पण आपण तेही विसरतो
तुम्हाला पोलीस अडवतात, सांगतात-
तुम्ही ड्रंक आहात पायी चालत जा,
तरीही तुमचे मित्र ओढून घेऊन जातात तुम्हाला दुसर्या अड्ड्यावर
मिट्ट काळोख पडलाय
पडदे खाली ओढलेले आहेत
की कधी सकाळ होऊ नये.