राग Collapsifera indica कोल्लॅप्सिफेरा इंडिकाच्या झुकणार्या सावलीत ह्या देशाचे भाग्य आज वाचले जात आहे कसल्या रागाने ओसंडून वाहतंय पित्त कसल्या रागाने पडलाय नशेत धुत्त…
Author
ranit Hoskote
ranit Hoskote
रणजित होस्कोटे हे इंग्रजीतील प्रसिद्ध कवी, संस्कृती अभ्यासक, क्युरेटर आणि भाषा व साहित्याचे गाढे व्यासंगी आहेत. त्यांनी आजपर्यंत सात काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या कविता इंग्रजीतील अनेक संकलनांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत, तसेच त्यांनी अनेक नव्या-जुन्या इंग्रजी कवींच्या कवितांचे संकलन आणि संपादनही केले आहे. चौदाव्या शतकातील प्रसिद्ध काश्मिरी कवी लाल देढ यांच्या कविता रणजित यांनी `आय, लल्ला' या नावाने इंग्रजीत भाषांतरित केल्या आहेत. एक निष्णात क्युरेटर असलेले रणजित, भारतातील अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृती देश-विदेशातल्या प्रसिद्ध कला उत्सवांत गेली अनेक वर्षे प्रदर्शित करत आहेत.