आठवतंय, तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला किंवा गुहावासीयांना किंवा वनवासीयांना आकाशाखाली, नैरोबीत वा सांगलीत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर, अग्निवलयांत साखळीडाव खेळताना नक्षत्रांत फिरत एक खेळ सुरू केला होता? श्वासाच्या स्पंदनाने, पृथ्वीच्या उबदार छातीत डोळे मिटून, भित्तीचित्रे रंगवून, उंबरठे ओलांडून, ओंजळीत नद्या धरून मैदानांपलीकडे निघून जायचा खेळ! आठवतंय, तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला वा सर्वांना, कळत-नकळत, क्षर-अक्षरमध्ये पंख फडफडवत दारा-खिडकीचे बोट धरून टेकडीच्या टोकावरुन सूर मारून अतल समुद्राच्या मांडीत बसायला पायी चालत निघालो होतो कॅप्टन नेमोबरोबर, सबमरीनचा बिल्ला लावून! मांडला होता एक खेळ!…
Prabodh Parikh
Prabodh Parikh
प्रबोध पारीख हे ज्येष्ठ गुजराती कवी, कथाकार, दृश्य कलाकार आहेत. मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. १९९३ मध्ये प्रकाशित झालेले कौन्समन (वंâसामध्ये/वंâसात) हे त्यांचे कवितांचे पुस्तक, गुजराती साहित्यातील एक महत्त्वपूर्ण संग्रह आहे. १९९३-९४चा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह (गुजरात साहित्य अकादमी) पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. १९९२-९५ मध्ये सर्वोत्कृष्ट गुजराती पुस्तकासाठी त्यांना सराफ पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कवितांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या गुजराथी कविता संग्रहाचे नौशील मेहता आणि रणजीत होस्कोटे यांनी इंग्रजीत केलेल्या अनुवादाचे पुस्तक `स्टील वॉटर' लवकरच प्रसिद्ध होत आहे. अनेक विषयांवर त्यांनी जगभर व्याख्याने दिली आहेत आणि त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत.