अक्षर मी तुम्हाला एक अक्षर देऊन जाईन कदाचित तुम्हाला माहीतच नसलेल्या अशा भाषेतलं असं होईल की तुम्ही त्या अक्षराला कुठेतरी ठेवून विसरून गेलेला असाल…
Piyush Thakkar
Piyush Thakkar
पीयूषविषयी थोडंसं मी तुम्हाला एक अक्षर देऊन जाईन ही आजच्या घडीतल्या गुजराती भाषिक परिदृश्यात जे गंभीरपणे कवितेकडे पाहाणाऱ्या व लिहिणाऱ्या कवी पीयूष ठक्करच्या लखू छू ह्या संग्रहातल्या ह्या ओळी आहेत. लखू छू म्हणजे लिहीत आहे, लिहितोय, म्हणजे तुम्ही काहीही म्हणा पण संग्रहाच्या शीर्षकातून त्याने एवंâदर प्रक्रियेबद्दल सूतोवाच केलेले आहे. मी लिहितोय, अमुक एक अंतराने, एखाद्या थांब्यानंतर, मात्र कविता त्याला स्वस्थ बसून देत नाही. त्याचा कवितेशी, स्वत:शी झगडा चालूच असतो. तो त्याच्या जगण्याचा विषय होऊन बसतो. त्याची आई, त्याचं घर, बाहेरचा कोलाहल, काळोख, अंधार-प्रकाशाचा खेळ त्याच्या कवितेतून सातत्याने येत राहतो. तो चित्रकारही आहे. व जगण्याच्या बारीक रेघा त्याच्या कवितेतून उमटत राहतात. अशा मनस्वी कवीचा जन्म १३ डिसेंबर १९७९ मिया मातर, गुजरातला झालेला. पीयूष तसा नरम दिलवाला बंदा मात्र कवितेतून सहजगत्या उलगडत नाही. त्याने लिहिलेल्या ओळीच्या विहिरीत पोहरा टाकावा लागतो. त्याच्या घरातल्या कपाटात तुम्हाला कपडे दिसणार नाहीत मात्र तेथे पुस्तवंâ दिसून येतील. चहा येईल व त्यासोबत एखादे पुस्तक. कवी, चित्रकार, अनुवादक, आस्वादक अशा वेगवेगळ्या फ्रेममधून तो दिसत राहातो. लखू छु ह्या संग्रहासाठी तख्तसिंग परमार पारितोषिक तर चित्रकलेसाठी नसरीन मोहमदी पुरस्कार त्याला लाभलेला आहे. सध्या बडोदा फाइन आटर््स फॉकल्टी, महाराजा सयाजीराव विश्वविद्यालयात असिस्टंट प्रोपेâसर म्हणून कार्यरत आहे. अशा युवा कवी पीयूष ठक्करच्या कवितेच्या ओळी आहेत. आजच्या घडीतला गुजरातीतला महत्त्वाचा युवा कवी. चित्रकार, प्रकाशक, अनुवादक, आस्वादक अशी ही त्याची ओळख आहे. लखू छू हा त्याचा कवितासंग्रह सध्या चर्चेत आहे. त्याच्या कवितासंग्रहाच्या शीर्षकावरूनच आपण सांगू शकतो की त्याचं लिहिणं चालू आहे. लिहिण्यामागे एक भूमिका आहे.