Home August 2022 दीर्घ कविता – संजीव खांडेकर
दीर्घ कविता – संजीव खांडेकर

संजीव खांडेकर यांनी आशय, आकार आणि अविष्कार अशा तिन्ही अंगांनी सातत्याने वेगळी कविता लिहली आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत कवितेचा आकृतीबंध, तिची लय व गत, तिचा पोत व बाज असा विविध पैलूंमधे बदलाचे नवनवे प्रयोग स्पष्ट जाणवतात. ते दृश्य कलावंत असल्यामुळे असेल कदाचित, परंतु त्यांच्या कविता वाचकांना सतत एक दृश्यभानही देतात. त्यामुळेच त्यांच्या कवितेचे अनेक नाट्य व रंगकर्मींनी नाट्य, परफॉरमन्स, वा समूह वाचनाचे प्रयोग केलेले दिसतात. जागतिकीकरण, मुक्त बाजारपेठ, माहिती तंत्रज्ञान, व जनूकशास्त्र अशा क्षेत्रांमधे झालेल्या विस्तृत व सखोल परिणांमांनी सतत बदलणार्‍या जगाचे प्रतिबिंबच नव्हे तर अशा बदलांना अनेकदा द्रष्टेपणाने सामोरे जाण्याचे धाडस त्यांची कविता दाखवते. स्वाभाविकच या कवितेत आपल्याला, सहसा अन्यत्र न आढळणार्‍या विषयवस्तूंचा भवताल स्पष्ट जाणवतो. स्टॉक मार्वेâट, कॉरपोरेटायझेशन, खाजगीकरण, वातावरण बदल, जेंडर फ्लुईडिटी, खनिज तेल, पेट्रोल, डॉलर, डाव्होस, आभास, या व अशा अनेक नव्या विषयांची, नवनव्या आकारांची, व नवअर्थछटांची नवी प्रतीमासृष्टी त्यांची कविता उभी करू पाहते. साहजिकच अशा प्रयत्नात पारंपरिक अविष्कार वा प्रतिमांची आपोआप मोडतोड होते.

सुमारे वीस वर्षांपूर्वी प्रथम व त्यानंतर लिहिलेल्या त्यांच्या कवितेत त्यांनी गेमस्केप व व्हिडीओ गेमसच्या कथनशैलीचा सहज व विनासायास केलेला वापर हे मराठी कवितेतले तरी पहिलेच व एकमेव उदाहरण असावे.

या अंकात त्यांची नवी कविता ‘चंद्र  च्युइंगम’ प्रसिद्ध होत आहे. पर्यावरण, वातावरण बदल, आणि त्याचे राजकीय व तात्विक भान नव्या प्रतिमांसह मांडणारी ही कदाचित मराठीतील पहिलीच व म्हणून मैलाचा दगड ठरावी.

गेमस्केप हीच याहि कवितेची ‘लँडस्केप’ आहे. गेम निवेदकही (नॅरेटर) बरोबर आहे.

‘नायक अर्थातच जरी आपण- तुम्ही आम्ही असलो तरी तो किंवा ती जुन्या शूट आऊट गेम्स मधील कमांडो किंवा अगदी अलीकडच्या ‘स्ट्रे’ गेम मधील मांजराचा अवतार वाटला तर नवल वाटू नये’ असे संजीव खांडेकर कविता वाचनानंतर म्हणाले होते.  – संपादक

 

चंद्र च्युइंगम

त्या विटांपाठले खडक असतील भिजून

गेले झिजून,

जागोजाग त्यांच्या उघड्या फटीतून

गोगलगायीची एकेक

चंद्रकोर

गेली असेल गळून.

असेल तिने गिळला

आख्खा चुकार चकोर,

किंवा गेला बाजार,

चतकोर –

या न थांबणार्‍या पावसात

नाचून दमून गेलेला मोर?

किंवा शेंदव जमून दमट झालेल्या

गाण्याचा तलम पडदा,

आणि बेडकाचा जबडा; –

खर्जातून उघडा…

अगं, तुला दिसला

तो फक्त

सांगाडा.

रबरी

वितळलेल्या कंडोमाचा

उरलेला सांडग्याचा पापुद्रा;

म्युझियमच्या मखमलीत

इथरच्या द्रावणात प्रागैतिहासिक वासाचा

चिपचिपीत चोथा

(त्याच्याच) डोळ्यांच्या खोबणीतून येणार्‍या

डिझेलच्या वासासारखा –

मातीचाच पण खवट खनिजी,

मंद्र सर्वत्र.

सुषिर स्वयंभू चंद्र च्युइंगम.

हवाहवासा

चाफा किंवा मोगरा.

जातिवंत तंबोरा

श्वासांच्या मधोमध

वाळून कोळं झालेला कालच्या किरमिजी

पक्षांचा थवा. गंभीर आणि घोगरा.

मुरलेल्या माशासारखा.

लोणची वासाचा

खमंग खारट तुकडा.

पाठोपाठ तळाशी पोहणारा, थेंबाएवढ्या सूर्याचा

सप्तरंगी पिसारा,

तसा हा पाण्यावरील तेलाचा वाटोळा

तवंग;

अतरंगी मलंग.

त्यात टायरचा रुतलेला, दणकट,

दरवेशी

घोड्याच्या टापेचा पोलादी नाल.

अश्मीभूत अमोनॉईड,

जसा.

तसा.

खांबातून पाताळाचे आकाश तोलणार्‍या,

दगडी जांघेतून

नरसिंह प्रगटावा

पण फॉसिलाईज्ड असावा,

जसा ठसा.

तसा.

तिथून पुढे मग

बगळ्यांच्या बग्गीला

माळेत गुंतवून उडवावे,

तशी ओलसर जमिनीवरून

दमट बुंध्यावर उंच

चढत गेलेली केवढी मोठी

बुरशीच्या बशांची रांग.

त्यावर एक नक्षीदार बोनचायना कप

ठेवून

घसा खरखरीत शेकवत गिळलेला

चहाचा तेजस्वी घोट

आठवेल तुला

आपसूकच मग

बुळबुळीत आवंढ्याचे

चमचमीत चघळले जाणारे हाड –

पुरवते ते तेवढेच जिभेचे लाड,

तशात यावा ओंडक्यासारखा

मध्ये आडवा

एक इवलासा पक्षी,

जंगलच त्याला साक्षी –

तसा हा अजस्र झाडाचा

उरलासुरला रुंद बुंधा;

किंवा सोंडेच्या सांगाड्यावर बसून गाणारी

लोखंडी नक्षी,

कसली म्हणशील तर उरलेल्या बुंध्याला

तहान लाडू भूक लाडू घेऊन आलेल्या

त्याच्या आप्तस्वकीयांच्या मुळांच्या माळेची केशिका जाळी.

प्रस्थर ओंडक्याचा आत ओढून बाहेर पेâकलेल्या जपाच्या माळेचा

पुढचा मणी; किंवा नुसताच पडलेला

धड नसलेला कुणी प्राणी; –

तो जरा बघ,

मंद्र सर्वत्र.

सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.

त्यांच्या दुर्बिणी आधीच

तपासत आहेत

जागोजागची

मुळांच्या खाली खोल

रुतलेली

मातीच्या गोळ्यांची वारुळे.

वळवळणारी गांडुळे

मुंगी किंवा मेलेली मधमाशी

हिरा मोती आणि सोन्याची राशी

ती बघ.

बघ, इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेली

नकाशांची भेंडोळी,

किंवा जळमटांच्या समाधीवर

स्तब्ध दगडी उभा कोळी,

बंदुकीतून सुटलेली पहिली गोळी,

किंवा मुंगीचे पोट फाडून वळवळणार्‍या

हिरवट माशीची गोल पांढरी अळी.

एक्सबॉक्स ३६०ची जॉयस्टिक नळी,

आणि करवतीने इलेक्ट्रिक

भुईसपाट झाडांवर धारधार लांबचलांब

खुळखुळणारी विळी.

तीही बघ,

करवतीच्या काट्यांवर जमतात जे जे

तेच पसरतात रानोमाळ.

जस्मोनेट.

हिरवट वासांचे –

बुलबुल पोपट मैना कवडे पतंग

जखमांचे सत्संग,

दमट साकळलेले सगळे रंग

ते उचल, कुपीत भर;

नोंदवहीत गुपित धर.

पुस्तकाच्या पानात दाबून पुâले किंवा पाने

जाळीदार पडद्याचा कशिदा आणि

पुराव्यांचा लगदा मळून कागद बनव –

म्युझियमच्या डू इट युवरसेल्फ दालनात

ओरिगामी, नोंदवही, स्केचबुक नवेकोरे,

स्वच्छ धुऊन आणि वगैरे,

चित्र आणि कविता.

धरित्री कशी माता पहा तिची समग्र गाथा.

मंद्र सर्वत्र.

सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.

जंगलतोडीचा जमा-खर्च लिहायला

मग मिळेल तेवढा करवतीचा वास उचल.

वुंâद हिवाळ्यातील सर्द कागदावर टिपून घे.

सगळी टिपे पानापानातून गळणारी

संभाव्य भाषेची गुप्त अंगे आणि अक्षरे,

दफनभूमीत उकरलेल्या श्वासांची भूयारे.

संकेतांची कोडी किंवा लांबलचक

होडी

तीही वल्हव थोडी थोडी.

नकाशातच नकाशापुरतेच हात पाय मार

नकाशातील स्पष्ट नद्या

सुप्त नद्या, गुप्त नद्या,

अस्पष्ट आणि अद््भुत नद्या,

कल्पित किंवा अकल्पित नद्या

त्यांचे वाहणारे, वाहिलेले, सुकलेले, सुकवलेले,

वळलेले, वळवलेले, बांध घातलेले,

प्रवाह, प्रपात, धबधबे आणि

गाळाने भरलेली पात्रे

बघ;

चुरगळ नकाशे

नद्यांना तोड मोड जोड

बाटलीत भर

बादलीत भर

सडे घाल

तलाव ताल

कुस्कर छान नदीचे गाल.

पीळ कान मोड मान, नदीला

दाखवत सूर्याची पिल्ले

सेल्फी काढ

गाळासकट नदी पुâगव

नदीचा पुâगा उंच उडव

खाली राहिलेल्या वाळवंटात

शोध हाडे पूर्वजांची,

वळवळणार्‍या सुरवंटांची;

इच्छा खाऊन घोंगावणार्‍या

घुंगुरट्यांची,

मॅगोटमधील इच्छारूपी माशीच्या मादीची;

मरून पडलेल्या नदीच्या पुâटलेल्या पुâग्याची

एका जीर्ण विस्तीर्ण पापुद्र्याची.

बघ

बघ, एवढ्या सार्‍या पसार्‍यातून नेमका झरा कोठून वाहतो?

आणि सरळ मुद्द्यावरच यायचं झालं तर –

तेलाचा वास कोणत्या झाडांच्या अबलख पुâलांना येतो?

याची गणिते मांडणारे, घरंगळलेले हे हजारो दगड बघ.

दगड धोटे पत्तर पोटे धोंडे

बाण शाळीग्राम सुपार्‍या आणि दगडी लिंगे

शीतळेच्या शिळा,

केशवाचा माथी टिळा;

ईडा पिंगळा मध्ये सुषम्ना

तसे

मांडलेले तर काही विस्कटलेले

कापलेले ताशीव तर काही कोरलेले ठाशीव

सांबरशिंगी कुळकुळीत संगमरवरी स्फटिकी.

पखरण तारांगणाचे, अगणित

जणू पुâटले झुंबर, मडले उंबर

तसे

सांडलेले आकाशातील दगड

किंवा म्हणा वीरगळ. (विराम)

तेलाच्या खाणीसाठी

सोन्याच्या शोधासाठी

चांदी रूपे पितळ तांबे

लोखंडाच्या मेरूसाठी

मिठाला जागून रेशमाच्या गाठीसाठी

सुतावरून स्वर्गासाठी मसाल्याच्या गोणीसाठी

हा दगडांचा दगडी ओघळ,

अविरत टपटप पानगळ –

तशी ही वीरगळ

जिथे विरघळते आणि विरून जाते

तिथे बघ;

बघ

तिथे तिथे तुंबलेले दगडांचे

एकेक तळे बघ

जीर्ण दगडी खुडूक डोळ्यांत

खडकाखडकांवर वाढणारे शेवाळे

तेही सगळे बघ.

शेवाळे शेवाळे शेवाळे

हिरवे निळे काळे शेवाळे

सावळे निसरडे पिवळे पांढुरके

पंचकल्याणी घट्ट शेवाळे

शेवाळ्यात गुंडाळून आणलेला

हा मासा बघ.

ताजा आणि फडफडीत.

सताड उघडे पण कुठेच न पाहणारे त्याचे डोळे बघ.

मंद श्वास

मधेच हलणारी शेपटी; पुâगलेले थरथरणारे कल्ले, बघ.

तडफड नव्हे नुसतीच फडफड.

फडफडीत मासा, शेवाळी मफलरमध्ये गुंडाळलेला मासा.

एकमेव.

म्हणून किमती.

या प्रजातीचा शेवटचा नर.

आता उरेल ते या सिरिंजमधील त्याचे रेत.

बाकी सारे प्रेत.

म्हणून अनडेड;

मरावे परी कीर्तिरूपी उरावे

असे, तर तसे.

तसा त्याचा निवलेला पण शिजवल्याने वटारलेला

सताड वाटोळा उघडा डोळा,

डेड कि अनडेड?

काहीही असो, तर तो काय पाहात असेल

ते सगळे तू बघ.

त्याचा कल्ला दाबून बघ. बाहेर पडणारे चिकट पांढरे पाणी पाहून बघ.

फडफडीत बघ.

फडफडीत जगण्याची जेवढी म्हणून

लांब उडी असेल

उंच उडी असेल

तेवढी सगळी लांब, रुंद, उंच, उडी

मारून बघ.

पाण्याबाहेर काढताना त्या शेवटच्या माशाने

जेवढी म्हणून मारली विंâकाळी तेवढी सगळी

जिवाच्या आकांताने मारून त्याला जे जे दिसले

ते ते बघ.

म्हणजे तुला कळेल समुद्रातील विहिरीचे रहस्य,

तेथील मर्मेडांचे विच्छेदन करून गोठवलेले स्मितहास्य,

अनडेड, म्हणून वॉन्टेड. प्रेâशली प्रिâझड.

मंद्र सर्वत्र.

सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.

आता इथे एक लांबलचक पॉझ घे.

दीर्घ श्वास, मग लांब उच्छवस…

माइंडपूâल! वन्डरपूâल

तर त्या मरमेडच्या प्रेâशली प्रिâझड हसण्याची प्रेâम त्या तिथे लावली आहे

जिथे सगळी गर्दी आहे ना तिथेच,

म्युझियमच्या सर्वात मोठ्या दालनात.

दिसली तुला?

टाचा उंच करून बघ,

मग दिसेल तुला.

प्रेâमच्या बाहेर एक प्रेâम,

तिला काटेरी तारांचे वुंâपण

त्यातून खेळणारा विजेचा प्रवाह,

त्या बाहेर चित्रविचित्र मुखवटे घातलेल्या

सुरक्षा रक्षकांची फौज

बाऊन्सर्स.

आणि त्या बाहेर ती तोबा गर्दी.

ती बघ,

काढ, अगदी खुशाल काढ एखादी सेल्फी;

इन्स्टासाठी.

गोठवलेल्या स्मितहास्याच्या प्रेâमसमोर

उभी राहून

तसेच हासून

खिदळून

हात उंचावून

किंवा कुणाच्या गळ्यात अडकवून;

काढून घे सेल्फी.

कारण क्वचित एखाद्या वेळी,

आणि खरंतर अलीकडे वारंवार

वाढणार्‍या गर्दीच्या उष्ण श्वासामुळे असेल,

कुणी म्हणतात उडणार्‍या कॅमेर्‍याच्या फ्लॅशमुळे असेल,

बाहेर अर्धवट खाऊन पेâकलेल्या बर्गर किंवा कोकाकोलाच्या रिकाम्या बाटलीमुळे असेल

वा मिनरल वॉटरच्या बुचामुळे, चॉकलेटच्या रॅपर किंवा चुरगळलेल्या टिश्यू पेपरच्या ढिगांमुळे असेल,

त्या कचर्‍याच्या कुंडीत मरून पडलेल्या कोंबडीच्या शापामुळे असेल;

तर जे काही असेल ते असो,

पण मग

या खोलीचे तपमान वाढते

त्या मत्स्यकन्येचे गोठवलेले स्मित वितळते.

हिमनदी वितळून सरकावी तसे प्रेâममधून सरकते

खाली ओघळते

कार्पेटवर पसरते

स्मित पुसून ओघळलेला चेहरा भेसूर दिसू लागतो

दालीच्या चित्रासारखा.

रक्षक धावतात, गेट्स बंद करतात. अ‍ॅम्ब्युलन्सचे सायरन वाजतात,

स्पन्जवर गोळा करत ओघळ टिपायला

घेतात.

शास्त्रज्ञ बोलावले जातात, बिगूल वाजवत मिळेल तेवढे उचलून

प्रेâममध्ये ठोसावे लागतात,

प्रिâझरचे पंखे चालवून गोठवावे लागतात.

देशोदेशीचे तज्ज्ञ तापमानाची गणिते मांडून आकडेमोडीवर सट्टा खेळतात

वितळलेल्या थेंबांची विंâमत राईट ऑफ करायला

नवे ताळेबंद जाहीर होतात.

कवी कलावंतांना इन्स्टॉलेशनची

महागडी टेंडरे मिळतात,

मेकपमन पूर्वीसारखे कारंजे स्मिताचे

चेहर्‍यावरच खणून काढत बर्फाळ रफू करतात.

ते ठिगळ, –

अघळ पघळ उधळमाधळ,

ते पण बघ.

थोडे चघळ.

पुन्हा पॉझ घे,

इथे इथे बस गं चिऊताई

बाळाचा खाऊ खाई

खाऊ खा पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन उडून जा

या भव्य म्युझियमच्या परसात उभे असलेले

ते दिव्य झाड पाहिलेस?

तो मुला-मुलींचा घोळका त्याचेच तर स्केच करतोय.

माझ्यासारखाच दिसणारा, त्या मुलांशी गप्पा मारणारा तोही

माझ्यासारखाच इथला गाईड आहे;

तो काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक.

तो सांगतोय की

हे झाड जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचे आहे.

कोणी म्हणतात दहा किंवा पंधरा हजार वर्षांपूर्वीचे आहे.

वॅâलिफोर्नियातून इथे आणले.

सिलिकॉन व्हॅलीने सप्रेम भेट दिले.

वणव्याच्या धुराच्या सात काळ्या वर्तुळांसकट हिशोब केला तर

पाच हजार सात वर्षे किंवा

दहा किंवा पंधरा हजार सात वर्षे,

कुणी म्हणतात आप्रिâकेत होते

चिन्यांनी ते उकरले

खाली तांब्याची खाण होती

आणि एका प्रेंâच वसाहतीच्या विष्ठेच्या अलीकडच्या खुणा होत्या

त्या सगळ्यासकट भाडेतत्त्वावर त्यांनी

आमच्या म्युझियमला दिले.

एका पुरातत्त्ववेत्त्याच्या अभ्यासानुसार

ते इराण किंवा इराकमधले असावे, किमान सीरिया लिबिया अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानातील

असावे.

आखाती युद्धात पेट्रिअट क्षेपणास्त्राचा मारा त्याच्या शेजारीच झाला,

एक फांदी मोडली, खाली पडली,

म्हणून अमेरिकी अध्यक्षांची मुलगी रडली,

अध्यक्षांनी मग फांदी उचलली,

झाड उखडले, म्युझियमच्या दारात ठेवले,

शांततेचे नोबेलदेखील फांदीलाच वाहून टाकले.

कुणी म्हणतात कलकत्त्याचा पिंपळ असावा,

जपानचा गिन्को किंवा तुर्की खजूर असावा;

आप्रिâकन चिंचेवरचा समाधिस्थ गोरख असावा.

योगेशवर श्रीकृष्णाच्या ऊध्र्वमूल अश्वत्ताचा

ढळढळीत अंश असावा,

एका बलाढ्य औषध वंâपनीच्या संशोधनाचा भाग असावा

किंवा डिस्नेच्या सेटवरील प्रतिसृष्टीचा भास असावा;

तसा हा वटवृक्ष

म्युझियमच्या परसात अवाढव्य उभा आहे

पानांशिवाय

खाटकाने मारलेल्या जनावरांच्या शिंगांचा ढीग लावावा

तसा, निष्पर्ण आणि निर्मोही

तो मेलेला नसावा

म्हणून जिवंत असावा.

अनडेड.

ळहर््ी्

म्युझियममधील अनेक वस्तूंपैकी एक.

त्याचे मूळ म्हणतात चार हजार वर्षे खोल आहे

हुंबाबाच्या पोटातून गिल्गमेशच्या लगद्यातून

रामायणाच्या पोथ्यांतून

महाभारताच्या गोत्यातून किंवा अगदी थेट

गुरगुरणार्‍या निअँडरथलच्या गुहेतून पसरलेले

आणि अंतराळातील यक्षिणीच्या अळींबीच्या छत्रीवरून

अलगद उतरलेले

क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे घसरलेले.

असीम इच्छांचे प्रच्छन्न मूळ,

ते तू बघ.

म्युझियमची दारे बंद होण्यापूर्वी बघ.

त्याच्या बुंध्यातील

काळपट मातकट वर्तुळे, किंवा

इतिहासाच्या आतड्यांचे अवजड वेटोळे.

किडामुंगीअळ्यांच्या पूर्वजांच्या अवशेषांची

अनाहत लक्तरे, वुंâभारणीची घरे आणि पांढुरकी कोषांची अगणित टरफले,

फडफडणारी फटीचटीतून शेकडो प्रस्थर शहरे;

वळवळणारी सत्तावीस सोळा सहस्र नक्षत्रे

ती तू बघ.

चिमूट चिमूट बुंध्यातून दमट गळणारा भुसा

निमूटपणे गोळा करणारी गाडीघंटा बघ,

काळ्या कृष्ण विवरात खोल गेलेला

अश्वत्ताचा आक्रसलेला पाय बघ,

पायथ्याशीच पुरलेला सोन्याचा हंडा बघ,

हंड्याच्या तोंडाशी मेसोपोटीयन नाग बघ,

झाडाच्या शेंड्यावर फिकट इराणी गरुड बघ,

अस्थिपंजर बुद्धाचा जमीन शिवणारा हात बघ,

अस्ताव्यस्त फांद्यांत भरकटलेले जहाज बघ,

शिडांमध्ये पांढरा मरगळलेला वारा बघ,

बुंध्यामध्ये सोंड घालून माज गळलेला हत्ती बघ;

म्युझियम बंद होण्यापूर्वी बघ.

दहा हजार वर्षांच्या झाडावर चढून

बिसलेरीचे पाणी पिऊन

प्लास्टिक बॉटल पायात धरून

दात विचकणारी माकडीण किंवा

ते म्हणतात तशी शालभंजिका तर बघच बघ.

मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम. मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.

मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम. मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.

मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम. मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.

मंद्र सर्वत्र. सुषिर स्वयंभू चंद्र च्युर्इंगम.