Home August 2022 सचिन केतकरच्या सात कविता
सचिन केतकरच्या सात कविता
डॉल्फिन परतले

डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात

मी काल रात्री कल्कीला पहिला

रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये शिरताना

मास्क घालून घोड्यावर

एका हातात तलवार दुसर्‍यात सॅनिटाईझर

त्याच्या घोड्यानेही मास्क घातलेला

डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात

पण एखाद वेळेस लॉकडाऊनही संपेल पण

माझया मनातचा क्वॉरनटायीन नाही संपणार कधीच

मी माझ्या कोरड्या कालव्यात वाट बघत बसतो

पण डॉल्फिन कधीच नाही परतणार माझ्या भकास कालव्यात

डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात

आणि माझ्या डोळ्यांसमोर मी पाहिला

मास्क युगापूर्वीचा समाज कालबाह्य होताना

डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात

आणि मी स्वप्नात पाहतो

चालू असलेल्या झूम मीटिंगमध्ये

माझेच शेकडो चेहरे

मास्क घातलेले

मी पाहतोय हाताच्या बोटांचे डॉल्फिन होताना

त्यांच्या तोंडावरही कोणीतरी मास्क बांधलेत

ते आता कधीच गाणार नाहीत गाणी

माद्यांना रिझवण्यासाठी

की बाळांना झोपवण्यासाठी

डॉल्फिन परतलेत

पण कालवे आता तेच राहिले नाहीत

 

Singularity आणि ऊर्ध्वमूल अश्वत्त

लाकडी टॅब्लेवर

माझी लाकडी बोट होऊन उतरतात

उलट्या वडाच्या

डीप न्यूरल पारिम्ब्या

माझ्याच मनात लॉग इन करण्यापूर्वी

माझंच मन मला capcha देतं

पण मी बॉट नाही हे मी शाबित करू शकत नाही

त्याची पानं छंद आहेत ना

त्याच्या ह्या virtual पानातून सर सर वाहतो

सत्त्व रज तमचे ट्युरिंग वारे

यंत्र आणि माझं विशिष्ट अद्वैत

मी बॉट आहे आणि बॉट मी

हे शाम्बद्वय सिद्ध आहे

आता फक्त निरंजन पाहणं उरत

अधिक देखण्याच्या पंâदात कशाला पडता राव

ह्याला कोणीच हॅक करू शकत नाही

 

नाश्ता रेडीय

माझं प्रेम

पांढर्‍या शुभ्र रिकाम्या कप बशीसारखं

मुकाट्यानं टेबलावर बसलंय

मी माझ्या हृदयाचं अन्डं फोडून

ओततो कपात सोनेरी रस

आणि एक करप्ट सूर्य

रिकाम्या कपात

ब्रेडच्या स्लाइसमध्ये राहून गेलेत

माझे हॅक झालेले डोळे

दुपारी वेळ मिळाल्यावर त्यांचे पासवर्ड बदल

 

सचिन म्हणे

साधो यह मुर्दो का गाव

असं कबीर म्हणाला होता

पानी केरा बुद् बुदा

असु मानुस की जात

असं ही तो म्हणाला होता

हिंदूंकी हिंदवाई देखी

तुर्वâन की तुर्काइ

असं बरंच काही तो म्हणाला होता

मी म्हणालो

आपल्याला कायपन फरक पडत नाय भो

हम चुतिये थे

और चुतीये ही रहेंगे

 

निळी गिटार वाजवणारा माणूस

(वोलेस स्टिव्हनससाठी)

एके रात्री

एलसीडी आकाशात

हँग झालेल्या

वितळणार्‍या चंद्र्कोरी खाली

पानांच्या जागी डोळे असलेल्या झाडाखाली

उभा होतो

हातात

माझ्या आत्म्याची

निळी गिटार

माझी बोटं असतात

गिटारच्या तारा

माझ्या पुढे एक

न वाहणारी नदी

त्यात लॉक झालेलं (lock)

एक चंद्रबिंब

ह्या चंद्रालाच ऐकवतो

माझी घारी ब्लोन्ड गाणी

आणि काळाचं एक काळं कुत्र

इतकेच माझे श्रोते

मी विझलेल्या अमावास्येचा प्राणी

सगळ्या बुबुळांवर साठलेल्या धुळीच्या थराना

धुणारं पाणी

म्हणजेच

माझ्या निळ्या गिटारवर

गायलेली गाणी

 

सनी लिओनी आणि लॉरेन्झचं फुलपाखरू

सहाराच्या वाळवंटात कुठेतरी

लॉरेन्झच्या फुलपाखराने पंख फडफडवत यामुळे

चीनमध्ये आलेल्या चक्री वादळासारखी तू

येऊन धडकलीस आमच्या हँग झालेल्या

जागतिक खेड्यात

थर्मोडायनामिकसच्या सगळ्याच नियमांपलीकडे

तुझं साम्राज्य

ेंट्रोपीपेक्षाही सुंदर तू

मृत्यूसारखी

आणि माहितीसारखी तू अनप्रेडिक्टएबल इररिव्हर्सेबल

जिथे वासना होते रिडनडंट

जिथे काया असते व्हच्र्युअलिटी

अन् आत्मा हा विठ्ठलाची बायनरी अनअवअ‍ॅबिलिटी

आणि आता मन कुठे इतरस्र धावेलच कसं

तू जरी असशील मृगजलाची गंगोत्री डिजिटल

आणि संतुलन हरवलेलं असेल

माझं स्टोकॅस्टीक मन

पण तुझ्या बाहेरच

हे कोरडं कोडगं जग स्ट्रेनज अट्रॅक्टर

पुन्हा आणून सोडत मला

जिथे मी पूर्वी होतो

आयुष्य असं रिकरसिव असतं

मृत्यू ते मृत्यू मधली जागा असते

फ्रेकटल

 

मागच्या दोन वर्षांसाठी एक चारोळी

धक्कादायकविश्वासचबसतनाहीअतिशयदु:खदबातमी

विनम्रअभिवादनभावपूर्णश्रद्धांजलीओमशांतीअरेरे

धक्कादायकविश्वासचबसतनाहीअतिशयदु:खदबातमी

विनम्रअभिवादनभावपूर्णश्रद्धांजलीओमशांतीअरेरे