Home August 2022 संपूर्णा चॅटर्जी
संपूर्णा चॅटर्जी
शहरं

शहरं

उन्हं खात बसता येईल अशा जागा आहेत का तिथं

गर्दीपासून दूर

सुंदर वाटतं का तिथं

लाऊड नाहीना वाटत

रस्त्यांना कशासारखा वास येतोय

बाया कसे कपडे घालतात

छान आहेत का त्या

तुला आवडतं का तिथं

तू सोडू शकशील का ते शहर

जर मी आले तर मला

आवडेल असं आहे का

घरापासून दूर एकटं असताना

आपण एक्स्चेन्ज करतो शहरं

जशा शपथा

 

हिरोशिमातील हॉटेल रूम

एक थंडगार मोठी रूम तुमच्याकडे पाठ फिरवून पडलेली

प्रेतासारखे ताठ पडलेले दोन बेड

भयंकररीत्या दुमडून ठेवलेले किमोनोज, त्यांची प्रत्येक घडी

आहे एक धारदार सुरी आणि

प्रकाश पडलाय, जसा की काळोखात भोसकल्याच्या खुणा

ही रूम काहीतरी भयानक घडण्याची वाट पाहतेय

आज झोपूही नाही शकणार ही रात्र

अखंड वाहताहेत नळ

कुणाचं तरी रक्त समुद्राकडे वाहून जातंय