Home August 2022 रशिया-युक्रेन युद्ध : एका भाषेवर लादलेले युद्ध!

रशिया-युक्रेन युद्ध : एका भाषेवर लादलेले युद्ध!

युक्रेनच्या साहित्यावर झालेल्या आक्रमणाबद्दल लिहिताहेत अ‍ॅस्कॉल्ड मेल्निकझुक

मराठी अनुवाद : अनिरुद्ध आचार्य

तिने प्रश्न उपस्थित केले म्हणून, कॅरोलिन फोर्चेला सत्तेचा खरा अर्थ: तुम्हाला जे जे हीन वाटेल त्याकडे दुर्लक्ष करण्याचा विशेषाधिकार

– ओक्साना झाबुझको

गोगोल या लेखकावरील १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात व्लादिमीर नाबोकोव्ह लिहितात – `युक्रेनियन बोली अभिव्यक्तीचे माध्यम झाली नाही यासाठी आपण नियतीचे (आणि लेखकांच्या प्रसिद्धीच्या हव्यासाचे) आभार मानले पाहिजेत. तसे झाले असते तर आपण सगळंच गमावून बसलो असतो.’ ते पुढे म्हणतात, `गोगोलने जर `त्या’ खुज्या रशियन बोलीत लिखाण केलं असतं तर ते मला एखाद्या दु:स्वप्नासारखं वाटलं असतं.’

व्लादिमीर नाबोकोव्ह यांनी निर्देशित केलेली ती `खुजी रशियन बोली’ म्हणजे युक्रेनियन भाषा. ज्याप्रमाणे स्पॅनिश भाषा इटालियन भाषेला जवळ जाते त्याचप्रमाणे युक्रेनियन भाषा ही रशियन भाषेला जवळ जाणारी आहे.

व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या प्रतिपादनात गेल्या शतकात असंख्य रशियन लेखकांच्या आणि बुद्धिजीवींच्या एका सुरात युक्रेनियन भाषेला हिणवण्याच्या भूमिकेचेच प्रतिबिंब दिसते, आणि अशा वृत्तीचे अपेक्षित तेच परिणाम होतात. भाषेविषयीचा हा पूर्वग्रह लाखो लोकांच्या कत्तलीस कारणीभूत झाला आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आणि सध्या रशियाकडून युक्रेनवर लादल्या गेलेल्या युद्धाच्या संदर्भातसुद्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे. पुतिन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की देशाच्या पूर्वेकडील `डोनबास’ म्हणून ओळखल्या जाणा‍Nया प्रदेशात बहुसंख्येने असणाNया रशियन भाषिक लोकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी युक्रेनवर हल्ला केला आहे.

मला माहीत असलेला युक्रेन हा असा एकमेव देश आहे जो प्रत्यक्षात येण्याचे स्वप्न एका कवीने पाहिले होते. १८१४ मध्ये वेठबिगार म्हणून जन्मलेल्या तारास शेवचेन्को, सहकारी कलाकारांच्या मदतीने गुलामगिरीतून मुक्त झाले. त्यानंतर या चित्रकार-कवीने युक्रेनमधील स्थानिक लोकांच्या कथा त्यांच्याच मातृभाषेत लिहिल्या. तारास शेवचेन्को गद्य रशियन भाषेतच लिहीत होते तरीही केवळ पद्य स्थानिक बोलीत लिहिले यासाठी रशियन साम्राज्याने त्यांना अनेक दशके तुरुंगवासाची शिक्षा दिली. तथापि, त्यांच्या युक्रेनियन भाषेतील कवितेचा प्रभाव स्थानिक लोकांच्या स्वत:बद्दलची ओळख दृढ करण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे तेथील कवींच्या कवितांमधून त्यांच्या संस्कृतीला दिलेले अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते.

भाषा ही सहजपणे दमनशाहीचे शस्त्र बनू शकते. रशियाने आपल्याच स्वत:च्या कवींवर केलेल्या सेन्सॉरशिपचा मोठा इतिहास आहे. विशेषत: नाडेझदा मँडेल्स्टम यांच्या पती ओसिपच्या

खटल्यावरील `होप अगेन्स्ट होप’ आणि त्याचा पुढचा भाग `होप अबॅन्डॉन्ड’ या लेखनामुळे ही दडपशाही अधिकच ठळकपणे समोर आली. तसे पाहता रशिया आपल्या वसाहतींवर नेमके कशा पद्धतीने आपले वर्चस्व लादते याबद्दल फार अल्प माहिती उपलब्ध आहे.

रशियात सरंजामशाहीच्या पतनानंतर दोन वर्षांनी, १८६३ साली गृहमंत्री पेट्र व्हॅल्युएव्ह

यांनी युक्रेनियन भाषेतील प्रकाशनांवर बंदी आणली. आश्चर्याची बाब म्हणजे ही बंदी `फिक्शन’वर आणली गेली नव्हती. कदाचित हा साहित्य प्रकार तोपर्यंत युक्रेनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकसितच झाला नव्हता, हे त्यामागील कारण असावे.

यानंतर तेरा वर्षांनी, १८७६ साली सम्राट अलेक्झांडर (दुसरा) याने जर्मनीतील एम्स गावी `स्पा’चा आनंद घेत, वेळात वेळ काढून युक्रेनियन भाषेच्या वापरावर आणखीन निर्बंध घालणारे धोरण जारी केले. सामान्य जनतेपासून गुप्त ठेवलेला ह्या नवीन नियमाने युक्रेनमधील सर्व प्रकाशने बेकायदा झाली, अगदी बाहेरील देशांतून आयात होणारी पुस्तकेसुद्धा. इतकेच

नाही तर युक्रेनची निर्मिती असलेले रंगभूमीवरील प्रयोग आणि युक्रेनियन भाषेतील गाण्यांची सादरीकरणे सुद्धा बेकायदा झाली. ही बंदी उठायला १९०५ साल उजाडावं लागलं.

स्थानिक शेतकरी वा शेतमजूर मूलभूत मानवी हक्कांसाठी आवाज उठवेल आणि त्यामुळे आपल्या सत्तेच्या दाव्यालाच सुरुंग लागेल अशी रशियाला भीती वाटत होती. १९३०च्या दशकात स्टॅलिनच्या आधिपत्याखाली युक्रेनच्या संस्कृतीवरील आक्रमण पराकोटीला गेले. मी ज्याचे वर्णन `प्रबोधनाचा गर्भपात’ असे करतो त्या काळात काय घडलं याची जाणीव

नसलेला एकही जिवंत युक्रेâनियन लेखक नसावा.

फॉकनर, रिचर्ड राइट, विला कॅथर, हेमिंग्वे, झोरा नीले हस्र्टन, मारियान मूर, विल्यम कार्लोस विल्यम्स, वॉलेस स्टीव्हन्स, जेम्स बाल्डविन यांच्याशिवाय विसाव्या शतकातील अमेरिकन साहित्याची कल्पना करा… त्यांच्याशिवाय समकालीन अमेरिकन साहित्याची कल्पना करा… हे निव्वळ अकल्पनीय आहे. पण युक्रेनमध्ये असे अकल्पनीय घडले.

१९३० साली सक्रिय असलेल्या दोनशे साठ लेखकांची संख्या १९३८ साली केवळ छत्तीस राहिली. दोनशे चोवीसपैकी सतरा जणांना गोळ्या घालण्यात आल्या, आठ लोकांनी आत्महत्या केली, एकशे पंचाहत्तर लोकांना अटक कींवा दफन करण्यात आले, सोळा काहीच निशाणी न ठेवता गायब झाले. यातील केवळ सात जणांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला

होता. स्टॅलिनने अशाच प्रकारे बेलोरशियन संस्कृतीचाही संहार केला.

पूर्वीच्या सोव्हिएत रिपब्लिकमध्ये लेखक आणि विचारवंतांना ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली,

तो गुन्हा म्हणजे त्यांनी स्वायत्तता आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याची आकांक्षा बाळगण्याची हिम्मत केली. इतर भाषांच्या आणि संस्कृतींच्या केवळ अस्तित्वामुळे आपण धोक्यात आहोत असे रशियाला वाटणे हा खरेतर एक मानसिक विकारच आहे. हा आणखी संशोधन घेण्याचा विषय आहे. या मनोविकारामागे आजवर झाकून ठेवलेले स्थानिक समुदायांवर केलेले

अत्याचार आणि गुन्हे उजेडात येतील ही भीती आहे. वंशवाद अनेक रूपं घेऊ शकतो. त्वचेचा रंग आणि धर्म यांशिवाय आणखी एक गोष्ट जोडली पाहिजे – सहज न उलगडणारी, सत्तेला असुरक्षित करणारी ती गोष्ट म्हणजे शब्दांचे पानावरील निर्माण होणारे आकार आणि आपल्या तोंडातून निघणारा त्यांचा उच्चार.

रशियन सैनिकांनी बुचा येथे घडवून आणलेल्या सामूहिक हत्या उघडकीस आल्यानंतर काही दिवसांतच, ३ एप्रिल रोजी, रशियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेच्या म्हणजे `आर आय ए नोवोस्टी’च्या संकेतस्थळावर एक दस्तऐवज प्रकाशित झाला. इतिहासकार टिमोथी स्नायडर यांनी त्यास रशियाचे `जेनोसाईड हँडबुक’ असे म्हटले आहे. ह्या दस्तऐवजाने एकेकाळी प्राचीन इतिहासासारख्या वाटणार्‍या, विसाव्या शतकातील सर्वात भयंकर असा काळ नवीन संदर्भ देत, तातडीच्या कृतींची गरज स्पष्ट करत समोर आणला.

स्नायडर यांनी वर्णन केल्याप्रमाणे : `रशियाचे `जेनोसाईड हँडबुक’ हा मला माहीत असल्यापैकी नरसंहाराचा सर्वात उघड असा दस्तऐवज आहे. यात युक्रेनियन राज्याचे आर्थिक

व्यवहार बंद करणे आणि युक्रेनशी संबंध असलेल्या कोणत्याही संस्थेला रद्द करण्याच्या सूचना

आहेत. या सर्व लोकांना म्हणजे वीस दशलक्षाहून अधिक लोकांना मारले जावे कींवा `लेबर कॅम्पस’मध्ये काम करण्यासाठी पाठवले जाईल; का, तर रशियावर प्रेम न केल्याबद्दल त्यांना स्वत:च्या अपराधी भावनेतून मुक्त करण्यासाठी. यातून वाचलेल्यांना सक्तीचे `पुनर्शिक्षण’ घ्यावे

लागेल. त्यांची मुले रशियन म्हणून वाढवली जातील. आणि युक्रेन हे नावच नाहीसे होईल.

`मेन हेप तवस आ गोलस ए डायर’ (Men hep tavas a gollas y dyr) कॉर्निशमधील एकमेव अशी ही ओळ मला माहीत आहे. महान ब्रिटिश कवी टोनी हॅरिसन यांच्या कवितेत असलेल्या या ओळीचा अर्थ असा आहे की, `जीभ नसलेला (भाषा नसलेला) माणूस त्याची जमीन गमावून बसतो.’ तसा युक्रेन कधीही जीभ (भाषा) विरहित नव्हता तरीही दीर्घ काळापासून जगाचा दृष्टिकोन तसं बघण्याचा झाला आहे. पण असं यापुढे होणार नाही. साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त झालेला हा देश आता एक बहुसांस्कृतिक राष्ट्र बनला आहे, जिथे तुमची ओळख ही तुमच्या भाषेवरून ठरवली जात नाही.

युक्रेनियन लेखकांच्या लेखनाची भाषांतरे काढण्याकरिता आज डझनभर प्रकाशकांची झुंबड उडाली आहे; मग ते युक्रेनियन भाषेत असो विंâवा रशियन, बेलारूशियन विंâवा क्रिमियन टाटरमध्ये लिहिलेले असोत. त्यांचे `शेल्फ लाइफ’ किती आणि कसे असेल हे पाहणे आता बाकी आहे. यातून एक गोष्ट मात्र निश्चित आहे – यानंतर कोणीही युक्रेनला ते एक `राष्ट्र’ नाही असे पुन्हा कधीही म्हणू शकणार नाही. सध्यापुरतं यातच काय ते समाधान मानून आपले सांत्वन करावे लागेल.

हा लेख अ‍ॅस्कॉल्ड मेल्निकझुक यांनी लिहिला असून ते एक अमेरिकन लेखक आहेत. त्यांचे कादंबरी, निबंध, कविता, संस्मरण आणि अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. `व्हॉट इज टोल्ड’, `अ‍ॅम्बेसेडर ऑफ द डेड’, `हाऊस ऑफ विडोज’ आणि एक्स्पट्स फ्रॉम  स्मेडलीज्: सीक्रेट गाईड टू वर्ल्ड लिटरेचर’ ह्या त्यांच्या काही कादंबर्‍या आहेत.