Table of Contents
रणजित होस्कोटे
ranit Hoskote
रणजित होस्कोटे हे इंग्रजीतील प्रसिद्ध कवी, संस्कृती अभ्यासक, क्युरेटर आणि भाषा व साहित्याचे गाढे व्यासंगी आहेत. त्यांनी आजपर्यंत सात काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या कविता इंग्रजीतील अनेक संकलनांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत, तसेच त्यांनी अनेक नव्या-जुन्या इंग्रजी कवींच्या कवितांचे संकलन आणि संपादनही केले आहे. चौदाव्या शतकातील प्रसिद्ध काश्मिरी कवी लाल देढ यांच्या कविता रणजित यांनी `आय, लल्ला' या नावाने इंग्रजीत भाषांतरित केल्या आहेत. एक निष्णात क्युरेटर असलेले रणजित, भारतातील अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृती देश-विदेशातल्या प्रसिद्ध कला उत्सवांत गेली अनेक वर्षे प्रदर्शित करत आहेत.