वटाण्या
बाबू गेणू दगडफोडे सोलतोय वटाणे
सांडतेय त्याची साल त्याच्या सभोवताली
८.२९ च्या बेलापूरमधल्या नजरांची ना त्याला फिकीर ना चिंता
तो बायकोबद्दल विचार करतो आणि सोलत बसतो शेंगा
बाबूचं त्याच्या सुमतीवर प्रेम आहे, तसं तिचंही आहे किव्वा तसा तो विचार करतो
पण त्यानं ते अजूनशान कन्फर्म केलेला नाय
पुâलकोबी सोलताना वा
फरसबी निवडताना
त्याच्या धडपडीनेच ट्रेन पोहोचते
त्याला कशाने मिळत असावं असीम सुखं?
शेंगांच्या होणार्या `पॉक’ अशा आवाजाने की
नाजूक वटाण्याचं त्याच्या हातावरच होणार्या हिरव्या विस्फोटाने
की, बेढभ हिरव्या, छोट्या, रसरशीत वटाण्याला त्याने तोंडात टाकल्याने?
बायकोच्या आठवणींचा लवलेशही नसलेला बाबू गेणू
जोपर्यंत घरी पोहोचतो तोपर्यंत त्याने
फस्त केलेले असतात एक-त्रितीआंश वटाणे
बाबू गेणू त्याच्या पोपटी बोटांनी बेल मारतो
त्याच्या हिरवटलेल्या बत्तिशीने ग्रीट करतो बायकोला
सुमती बाबूच्या ह्या ध्यानाला पहाते, पण प्रेम करते ती तिच्या बावळट मिष्टरवर
विचार करते की, त्याचंही तिच्यावर तेव्हढंच प्रेम आहे
पण तिने ते अजूनशान कन्फर्म केल्यालं नाय.