ललदद्य ललबाय
मेल
फिमेल
लेस्बियन
गे
बायसेक्शुअल
ट्रांसजेंडर
क्विअर
दगडधोंडेमाती
सारे चराचर
केव्हढी ही दु:खाची गलबतं
प्रत्येकासाठीच गलबलून येतं
हजारो वर्षांचा थकवा
वाहतोय सार्याच्या धमन्यांतून
हरवलीय झोप युगायुगांपासून
खूप खूप गरज आहे एका शांत झोपेची
कदाचित एखादं सुंदर
स्वप्न तरी पडेल
किंवा खडखडीत जाग तरी येईल कायमची!
म्हणूनच
ललगालगागा ललगालगागा
गा ललदद्य ललबाय
गा ललदद्य ललबाय
या अखिल विश्वासाठी…
अवकाश माझाय…
पण माझ्या आत जे साठलंय ना
ते अजिबात डिस्टॉर्ट न होता
अगदी तसंच्या तसंच येऊ शकेल का बाहेर?
खरं तर हीच भीती वाटतेय मला
अन् त्यालाही…
तयारी आहे त्याची सोसायची
अनंतकाळचा गर्भावास
अगदीच मरावं लागलं एवâत्र
तर तेही चालेल
पण मला वâरायची नाहीय घाई जन्मायची
खरं तर मस्तच वाटतंय
या पाण्यात तरंगायला
हे पाणी माझंय
हा अवकाश माझाय
मला माझ्याचसारखं दुसरं वुâणी असेल
असं वाटत नाहीय
मग बाहेर येण्यात काय हशिल?
वुâणाशी बोलायची मला
इच्छाच होत नाहीय
कारण माझंच गाणं अजून संपत नाहीय
माझ्या गाण्याचे शब्द
ऐकायचे असतील तुला
तर
तुला `मी’ व्हावं लागेल
पण तू `मी’ झाल्यावर
मग वâोण उरेल?
`तुझंमाझं’ वâी `माझंतुझं’ गाणं उरेल?
गाणं तरी खरंच असतं का तुझं किंवा माझं?
ते येतं कुठून आणि जातं कुठे?
हे तरी कळलंय कातुला?
तसं तर ते मलाही नाही कळलेलं…
आकाशगंगेमध्ये आहेत म्हणे अनेक आकाशगंगा
त्यांना तरी ते माहितीय का?
गर्भाशयात असतात अनेक गर्भाशयं
अन् गर्भाशयात असतात अनेक गर्भ
अन् त्या गर्भांना असतात अनेक गर्भाशयं
म्हणूनच मस्तच वाटतंय
या पाण्यात तरंगायला
हे पाणी माझंय
हा अवकाश माझाय….
आपुले मरण मी…
मी जन्माला आली तीच मेलेली
मी जन्मताच आई मेली
मेली म्हणजे तिने ठरवलं की
ती कायमच माझ्यासाठी मेलेली असेल
बाप तर फक्त बीज वाहक
तो कधी जिवंत होता हे असेल
फक्त मेलेल्या आईलाच माहीत
माझ्या जन्माअगोदर जन्मलेल्या
भावाबहिणींना याबद्दल विचारावं म्हटलं
तर तेही आले स्वत:च्याच श्राद्धाचं जेवायला
हे सगळं काय आहे म्हटलं
विचारावं लोकांना
तर कळलं
माझ्या मरण सोहोळ्याच्या आनंदानं
सार्या गावानंच केलीय
सामूहिकआत्महत्या