एड्रियाना लिसबोआ
Adriana Lisboa
एड्रियाना लिसबोआ ब्राझीलच्या आघाडीच्या कादंबरीकार आणि कवी आहेत. २००१ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘सिंफनी इन व्हाईट’ या पहिल्याच कादंबरीला होझे सारामागो पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांचे साहित्य वीसपेक्षा अधिक भाषांत अनुवादित झाले आहे. त्यांचा इक्वेटर हा इंग्रजी अनुवादित काव्यसंग्रह पोएट्रीवाला प्रकाशनातर्पेâ २०१९ साली प्रसिद्ध झाला आहे.