Home August 2022 आल्हाद भावसारच्या पाच कविता
आल्हाद भावसारच्या पाच कविता

१.

अरे मला माझ्या पावलांचा आवाज

सहज ऐकू येतोय

इव्हन टाचण्या पडण्याचा ही

आवाज

माझ्या अंतर्मनातला

तर अगदी स्वच्छ, अगदी स्पष्ट

इतना सन्नाटा क्युं है भाई?

मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना?

अरबी समुद्राला वडवानलने जिवंत जाळले तर नाही ना?

अशा शैलीदार सवालांच्या लडीतूनही हाती लागत नाहीये उत्तर

की आताशा

पेâसबुकवर

कुणी पेरलेले विचार

तरारून आलेयं

की व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुपौग्रुपी

सदसद्विवेकबुद्धीच्या तेजाची झगमगझगमगझगमगझगमग

की आख्ख्या सोशल मीडियाचं

मी कात टाकली मी कात टाकली

वगैरे गाणं टॉपवर जाऊन पोहचलंय

की आणिक काही

की आणिक काही

आणिकं

तसंलंही काहीही नसेल तर

तसंलंही काहीच नसेल तर

आत्मज्ञानाचा

हा दुर्लक्षित दुर्मीळ माहौल

खतरनाक गोष्टयं भौ

आणि

तो प्राणपणाने जपणं

हे तर मरणाहूनि सुंदरहे भौ

आता कुठल्याही

आवाजानं शब्दानं

या स्वर्गीय

शांततेवर

ओरखडाउमटताकामानये

इतकंचनाहीतरहेकवितासदृष्यशब्दओळी

अलगदअलगदनाहीश्याकरणेहेपहिलेकामहेसुखसांभाळण्याच्यामार्गाव्रलिल

भौकळंतयंकाकाई?

 

२.

दिक्काला पलीकडे पायची गरज नस्ते

नजर जिवंत पायजे आपल्या आसपासच

दु:खाचे डोंगर उभे दिसता

कसलं अध्यात्म पचवून

ही माणसं

जीवघेण्या दु:खात

सहज जगून जातात

त्यांच्या दु:खाला अश्रू नसतात

त्यांच्या दु:खाला शब्दही नसतात

आणि इथे तर चिमूटभर दु:खाचे प्रदेश

माणसं पिढ्यान्पिढ्या पालथे घालत

सभासंमेलनातून टाळ्या घेत

पुस्तकांतून अमर होऊ पाहता

 

दारंखिडक्या घट्ट बंद करून घेतले आतून दोन्ही अडसर घालून

वर्तमानपत्रं कधीच बंद केले होते

केबल काढून पेâवूâन द्यायला वर्षे लोटली

सिमबिम चेचूनचेचून गतप्राण केला अ‍ॅन्ड्रॉइड

तेव्हा कुठे हायसे वाटायला लागले

शेजार्‍याबद्दलचा संशय सायबर पार,

गेला विरून

ना धुरळा ना आवाज जराही

जरी गडगडल्या परस्परांतील अदृष्य भिंती

मला खूपच हायसे वाटायला लागले

प्रार्थनेच्या सुरात कुणीतरी प्रतिज्ञा म्हणायला लागले

मला खरोखरच हायसे वाटायला लागले

आपल्यातले प्रेम, आपल्यातील करुणा,

आपली सनातन अहिंसा हेच सत्य आहे

बाकी सर्व मतपेटीत बंदिस्त आहे..

 

स्वत: त परतीचे रस्ते ट्वेंटीफोरबायसेव्हन्स्

खुले असतात म्हणून

सगळेच मोरू

परतून येतात असेई नै

खर्‍या अध्यात्म्याची गोष्ट

कुण्या बाबाबुवाकडे नसतेच

ती अस्ते आपल्याच

कडीकुलूपात बंद

न किल्ली कनवटीला

भाई मत टटोल बाजूबंद

सुन

उड जायेगा हंस अकेला

लई स्वस्तात सांगून गेलेत रे साधुसंत

 

हा तीव्र डेसिबलचा कोलाहल

खणखणीत धारदार

यादवीच्या दुदंभी

हिंसक ललकारी

भयकारी भयकारी

भाषेतून भय पेरत

काळ सुसाटलायं चौखूर

आसमंतभर धूळंचधूळ

डोळे उघडे ठेव

चष्मा पुसून घे

सत्य आणि ज्ञान

प्रेम आणि करुणा

शब्द अवघडयेत

शिकून घे!