सोशल जस्टीस वॉरियर्स
हे लोक कोणत्याही, अगदी कोणत्याही पोलिटिकल करेक्ट, किंवा सोशली प्रोग्रेससिव्ह किंवा लिबरल विचारांसाठी भांडायला उठतात विदाउट बॉदरिंग की आपण काय करतोय, आपली ऑक्स काय वगैरे. का बनतात लोक एव्ें? वैयक्तिक वैधता (ज्ीेदहaत् न्aत्ग््aूग्दह) याचे कारण असू शकते असे विकिपीडिया म्हणते- खरे खोटे विकिपीडिया एन्ट्री लिहिणार्यालाच
ठाऊक. वैयक्तिक वैधता म्हणजे काही लोकांच्या प्रभावामुळे (हे प्रभाव पाडणारे लोक आपआपल्या अवकाशात विचारवंत, नावाजलेले, अवांत गार्ड अशा कॅटेगोरीतले असतात) त्यांच्या सारखे दिसण्या वागण्या बोलण्याच्या हव्यासापायी (ज्यामुळे इतर लोकही त्यांना प्रोग्रेससिव्ह वगैरे समजतील या भाबड्या आशेने) एव्ें त्यांच्यासारखे करायला जातात आणि स्वत:चा पोप्स करून घेतात. बर्याचदा विषय देखील नीटसा माहित नसतो, त्यावरचा अभ्यास तर लै दूर कि बात आणि त्यामुळे पोपट होण्याचे गच्च पोटेन्शिअल. कवी
लेखकांवर कोणीही केलेला अन्याय वगैरे साठी कसलाही विचार ना करता हे योद्धे बॅण्डविड्थ वाया घालवतात. तर, असो.
हिपस्टर
सगळ्यांपासून वेगळे आहोत हे दर्शविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे लोक. हे लोक खूप लोकप्रिय गोष्टींचा तिरस्कार करतात आणि आपली अभिरुची कशी वेगळी आहे हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात- त्यासाठी हटके कपडे, हटके बूट, हटके विचार, हटके पुस्तके, हटके आर्ट, सगळे एकदम हट हट- जे सर्वसाधारण लोकांना आवडत नाही ते या हिपस्टर्सना मुद्दाम आवडून घ्यावेसे वाटते- हटके वाटून घ्यायला- एका हिपस्टरला दुसरा हिपस्टर थ्रेट वाटतो- कारण ते स्वत:ला युनिक समजतात. ज्या गोष्टी हिपस्टर्स गोंजारत बसतात, त्या मेनस्ट्रीम झाल्या कि त्यांची पंचाईत करतात. जसे पूर्वी हिपस्टर्स म्हणायचे चित्रे-कोलटकर वाचले का? मग काय वाचले तुम्ही? आता प्रॉब्लेम असा झालाय कि चित्रे-कोलटकर
मेनस्ट्रीम झालेत त्यामुळे आजचे हिपस्टर्स नाही बोलत असे. तर, असो.
बबडीचे पहिले पाऊल
बबडी उठलीच तशी उशीरा कारण कालची उतरली नव्हती पण एका मित्रानी तिला
फोन केला भल्या सकाळी ११ला म्हणून वैतागत उठायलाच लागलं. एकदा उठण्याची जबाबदारी घेतल्यावर डोळेपण उघडायलाच लागले आणि तोंडपण उघडायलाच लागलं. बीलाचं कै कराचं वैâ कराचं असं पुटपुटली तेव्हा तिच्याआयला वाटलं की पोरीला विजबील आलंय त्याची कोण पडलीय आणि जबाबदारी कळायला लागल्यानी आईचा थक्कपणा जातो न जातो तोच बबडीचा ड्याडा (ह्होच्च मुळी बबडी बापाला ड्याड्डाच्च म्हणते) म्हणाला
की ती फोनच्या बिलाबद्दल म्हणतीय कारण नेटपॅक संपला तर तिचं सोशल समाजातलं स्थानच धोक्यात येईल ना. इतका समंजस बाप आणि आणि खंबीर टामबोय आई असूनही रणरागिणी बबडी मात्र चिंताक्रांत होती.
बबडीला ना नेटपॅकची ना वीजेची चिंता ना नेटपॅकची चिंता तिला पडलीवती ती कुठल्याश्या संसदेतल्या बीलाची. ते कायतरी पास होणार होतं म्हणे लोकसभेत का राज्यसभेत. सोशल सायंन्सच्या तिच्या एम्पीस्सी करत बसलेल्या मित्रानी तिला बसल्याबसल्या सांगितलवतं
की ते एक बील येणारे ते फार वाईट आहे. त्यानी दुसर्या दिवशी इथे कम्युनॅलिझम येणारे आणि त्यामुळे खूप दुष्काळ वगैरे पडायचीपण शक्यता आहे. आणि त्यामुळे साध्या क्वार्टरलाही
माणूस महाग होईल. विडीकाडीचेच मूळ वांधे होतील. त्या मित्राच्यामते हा जो अवकाळी अतिवृष्टीचा पाऊस झाला तोही ह्या आगामी कम्युनॅलिझमच्या अरिष्टाचीच चाहून होता.
बबडी त्यामुळे हबकून होती. तरी मोठ्या धैर्याने ती याला सामोरी गेली. येताना केस पर्म करून आली. थोडा आंदोलन के जैसा वाला मेकप करून आली. फॅबमधे जाऊन खादीखरेदी झाली पण नंतर फार मोठी समस्या तिच्यापुढे आ वासून उभी राहिली ती म्हणजे शबनम बॅगेची. आंदोलन किंवा निषेध म्हणजे शबनम मस्टच असं तिनी तिच्या डॅडाच्या मित्राच्या एंजिओसाठी काम करणार्या परदेशातल्या मैत्रिणीकडून ऐकले होते तेच तिच्या मनानी घेतले.
शबनमसाठी गावात जावे लागेल, मेन मार्केटमधे जावे लागेल, औह् वाट रबिश् कमोन, आय डोंन वांटू गोटू आल द्याट सिटी एरिया…
पण समस्येवर मात न करेल तो डॅडा कसला. त्याने पाच मिनिटे डोके हलवून विचार केला. दोन मिनटे नामस्मरण केले. आणि क्षणार्धात उठून चपळाईने वार्डरोबकडे धावला.
मधेच्य पास्त्याच्या प्लेट्स घेऊन येणारी घरसखी (कामवाली) राधिका रोहमारे धडकता धडकता वाचली. आई गे.
वार्डरोबमधून आणिबाणीला आणि त्या आंदोलनाला वीस वर्षे झाली म्हणून त्यावेळी बाजारात आलेली एक खादीची साडी आणलेली होती ती आणि अभयकाकाचा धाकटा भाऊ कारसेवेला गेला होता तेव्हा येताना फुकट मिळालेला शेंदरी फेटा त्याने नंतर मतपरिवर्तनाची आठवण म्हणून दिला होता तो घेऊन डॅडा जवळजवळ धावतच बाहेर आला. डाक्टरकाकानी पावावादन शिकवताना त्याला शिवणकामाचेही धडे दिले होते. त्याला स्मरून त्याने एक तासात जुनी साडी बाहेरून आणि त्याला शेंदरी फेटा आतून अस्तर म्हणून वापरून झक्कशी धम्माल शबनम बनवून दिली. पम्यामामाला शबनम म्हणलेले आवडत नसे तो त्याला देवझोळी
म्हणे. बिर्याणीलाही तो श्रीरामभात म्हणत असे. त्याला बबडी, ड्याडा, बबडीची आई, राधिका
रोहमारे आणि बबडीच्या आईशी फोनवरून बोलणारा एक मित्र गुलशन यादव खूप हसले…
शबनम बॅगेचा यक्षप्रश्न सुटताच तिने पहिली जळजळीत पोस्ट टाकली प्दै म्aह ुदन्ीहसहू rल्त ूप म्दल्हूrब्?
इतिहासातून आशिकीदर्शन
चिं. त्र्य. सरलष्करे सुदैवानी विनापाश वारले. त्यांच्या घराजवळ राहाणारे हाफप्यांटीतले
बबडू दंताळे आणि गण्यागंपू जगदाळे त्यांच्या दाराशी लहानपणापासून अक्क्याटोक्क्या खेळत. सरलष्करे कधी त्यांच्यावर खेकसले नाहीत. पण जास्त गोंधळ झाला तर मृदू पण करारी आणि करड्या पण प्रेमळ आवाजात दंगेखोर मुलांच्या गोट्या जप्त करीत. अशा जप्त केलेल्या गोट्या ते आपल्या डायरीत ठेवीत. डायरी भरली की ती एका बरणीत भरून ठेवीत. अशा चाळीस बरण्या भरल्या की त्याची एक गासडी करून सरकवून ठेवीत. वर्षामागून वर्षे सरली. गोट्या खेळणारी मुले वयात आली. मोठी झाली. गोट्याजप्तीच्या भितीने फिरकेनाशी झाली. शिकूनसवरून मार्गी लागली. नान्यानी बबडू दंताळेच्या वहिनीच्या भाच्चीच्या मावसबहिणीशी लग्न केले. गण्यागंपू जगदाळेनी त्या मावसबहिणीच्या चुलत बहिणीचे चांगले चालत आलेले सोन्यासारखे स्थळ नाकारले. तेव्हापासून दोन्ही घराण्यांमधे मैत्रीपूर्ण तेढ किंवा तेढपूर्ण मैत्री होती. त्यातून सरलष्करे सरांनी मनमिलाफाचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ ठरले. त्यांच्या म्हजे चिंतोबा त्रंकेश्वर सरलष्करे यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या मावशीच्या सुनेच्या पुतणीने नानाच्या मदतीने वारसाहक्काने त्यांचे राहाते घर ताब्यात घेतले
आणि आतल्या एकूणेक गोष्टी, पुस्तके, शब्दकोश, मासिके, नवभारतचे अंक वगैरेसकट सगळ्या वस्तू भंगारात काढल्या. हा हा म्हणता ही बातमी पाचसात लोकांच्या जनसमुदायात पसरली आणि पहिला धावला तो गण्यागंपू जगदाळे. गण्यागंपूला तश्याच काही प्रकारे काही गासड्या मिळवता आल्या. त्यात लहानपणच्या गोट्या दिसल्या. इवल्याइवल्या, रंगीबेरंगी. गण्यागंपू हरखला. आठवणींचे पाणी तरळले. त्या डायर्यांमधे अजून काही खजिना होता. सरलष्करे आजोबांनी लिहून लिहून मुंबईच्या वेगवेगळ्या मासिकांना पाठवून साभार परत आलेले
लेख आणि दुसर्यांच्या लेखांची माहिती. शिवाय पत्रे तर हवीच!! तीही होती. गण्यागंपूनी ते ताब्यात घेतले. रितसर फेसबूक वाटसअप गट जॉईन केले. एकेक पान काढायचे रोज गटावर टाकायचे असा दणकाच लावला. मोठ्ठाल्ले साहित्यिक अभ्यासक गण्य् ाागंपूला टरकू लागले. बघताबघता मौजमजा प्रकाशनाने शेवटी त्या लेखनाचे पुस्तक छापायची परवानगी मागितली.
भले भले लोक गण्यागंपू जगदाळेच्या पायाशी लोळण घेऊ लागले. गमतीत जोपासलेल्या छंदाचा असा मोठा वटवृक्ष झालेला पाहून गण्यागंपूची आजी कौतूकानी कानावर बोटे मोडून म्हणाली.. `बस इक नजर चाऽहिये.. आशकी केऽऽ लिये’