Home August 2022 आबरा का डाबरा

आबरा का डाबरा

मार्क्सवादी समीक्षा

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या आवारात दिगंबर पाध्ये कपडे घालून फिरताना आढळून येतात या कुचेष्टेपासून ते आजचे आघाडीचे जागतिक विचारवंत, डाव्यांचे पोस्टर चाचा स्लावोज झिझेक यांना सेलिब्रेटी स्टेट्स मिळेपर्यंत मार्क्सवादी समीक्षेत बरीच उलाढाल झालीये.

प्रयोग करणार्‍या नाटक कादंबर्‍या, अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला प्रमाण मानणारे साहित्य, भांडवलदारी अत्तरात घमघमून नाकात जाणारे नवदोत्तरी साहित्य, गावातले जिणे, हाल, उपेक्षा, पाऊस-पाणी या रीपीटेडली हमखास यशस्वी कन्टेन्टचे दळण जुन्या गिरणीत दळणारे ग्राम्य साहित्य, तेच ते आणि तेच ते प्रादेशिक, धर्मीय, वैचारिक साहित्य, सोशल माध्यमातून दररोज मनावर वेडझवे परिणाम करणारे कन्फेशन, प्रेम, निसर्ग, अस्तित्व यांत लोळणारे साहित्य अशा एकूण सर्व साहित्याला आज मार्क्सवादी समीक्षा एक नवा दृष्टिकोण देत आहे. सर्वांच्या तळाशी पैशाचा व्यवहार असतो, हे सुदैवाने साहित्यातही खरे आहे याचा दुर्दैवाने बर्‍याच श्रीमंत/ गरीब लेखक/ समीक्षक/ प्राध्यापक आणि वाचकांना विसर पडलाय.

—–एक विशिष्ट चाहतावर्ग असलेले निवृत्त प्राध्यापक रामचंद्र (मित्रांसाठी रॉम) बोराडे यांनी त्यांच्या नातवाच्या बेबी शॉवरप्रसंगी केलेल्या औपचारिक भाषणातील एक परिच्छेद.

G O A T (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स)

आपल्या मोबाइलमध्ये लॅपटॉपमध्ये किंवा कुठल्याही स्मार्ट डिव्हाइसमध्ये हे गोट बसूनच असतात. मेसीजेस, पोस्ट्स, कॉमेंट्स, फोटोजमधून हे दिवसातून कमीत कमी दहा वेळा झलक मारतात. त्यांचे सुमार फॉलोवर्स मग त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत सुटतात किंवा त्यांच्या मेसेज/ पोस्टवर आपली जाडजूड अक्कल चालवतात, दुजोरा देतात, तारिफोके पूल्स बांधतात; गोट कृतकृत्य. गोटने जर झलक मारली आणि कोणी त्याला भाव दिला नाही विंâवा निगेटिव्ह लिहिले की गोट पुâल्ल डिप्रेशन मोडमध्ये… लोकांना डिवचून डिवचून, धमक्या देत रिस्पॉन्स देण्यास भाग पाडतो. एवूâण काय, समझ गये ना भाई बेहेन लोग?

या सुमारांच्या गोटचे दैनिक समागम बर्‍याचदा दुसर्‍या गोटचे लोंबते आस्वादतात पण आपसांत तो गोट आपल्या गिनतीतच नाही असे भासवतात. फूल्ल एन्जॉय! आपला गोटच खरा बॉस!

होमवर्क

सौरभ सकाळपासून‌ गप्पगप्प होता. नेहमीप्रमाणे हुंदडत नव्हता. स्मुदी पण घेतली नाही थिओब्रोमाची पेस्ट्री होती त्यालाही हात लावला नाही. एकटा एकटा विचारात गढलेला.

अस्वस्थ. मधूनच खोलीत जायचा काहीतरी करायचा आणि परत इकडेतिकडे येरझा‍र्‍या घालायचा. लर्न फ्रॉम होम करीन म्हणाला. शाळेतपण गेला नाही. मनालीमावशीनी सॅनहौसेनी पाठवलेली ड्रॉयफ्रूट्सही तशीच पडलेली होती. तीही खाईना. सतत चुळबुळ. सतत जा ये. सतत इकडेतिकडे करणं. स्वत:शीच बोलणं. दोन खुच्र्यांमधून उडी मारल्याची अ‍ॅक्शन करणं असं सगळं चालू होतं. उद्याचे नकुल-सहदेव घडवणा‍र्‍या अर्जुन अकॅडेमीत शिकवायला जाणारा एकलव्यदादा हा त्याच्या भूमी आणि ओवी ह्या समिधाच्या शेजारी राहाणा‍र्‍या एक्सगर्लफ्रेन्ड्सना भेटायला जाताना सौरभला हायहॅलो करायला आला तेव्हा सगळा उलगडा झाला. सौरभचे मित्र पॉटी पटेल आणि गॅनी गायकैवारी (पॉटीचं नाव परमबीर आणि गॅनी फॉर गंधार). दोघांच्या मित्राच्या मित्राच्या मित्राच्या क्लासमध्ये करंडकवीर पुरस्काराचे वितरण करायला एक नटुरामकाका आला होता. त्याने सगळ्यांना दहशत वाढवायचा आग्रह केला.

जेवढे दहशतीचे पॉइंट मिळतील ते सगळे शाळा सोडताना रिडीम करता येतील असंही सांगितलं होतं. ते दहशतीचे पॉइंट कसे गोळा करायचे? शस्त्र कुठून मिळवायची? हल्ले

कुणावर, कसे, कुठे आणि काय कारण काढून करायचे? ह्या चिंतेत सौरभ होता असं अर्जुन बोधिनीत शिकणा‍र्‍या एकलव्यदादानी खुलासेवार सांगितल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दहशत वाढवायची तर रणबीर सिंगला मुख्य भूमिकेत घेऊन स्वप्नातल्या ट्रेनने फिरणा‍र्‍या टेंक्षेमामावर बायोपिक करायला सांगूया आपण महेश कासकरकाकांना, पण आत्ता तरी तू नि:संकोचपणाने शाळेत जा असं त्याला सगळ्यांनी समजावलं. बरोबर डबा, खाऊ आणि करंडकवीर टेंक्षेकाका बाळगतो ते शस्त्र म्हणजे धारदार तळपती दुटोकी टूथपीक दिल्यावर सौरभच्या चेहे‍र्‍यावर उग्रनिरागस हास्य फूललं. यहाँ का टूथपीक टूथपीक बायोपिक है! अशा घोषणेने सौरभचं मन दुमदुमून गेलं… आणि स्वारी शाळस्थ झाली…

लोका सांगे

(पुढच्या वेळी, EDotic बहूचा गालगुच्चा)