हार्ट अॅटॅक देईन बत्तिशीत…
आयुष्य लगावून देईन थोतरित
हसू होरपळून जाईल पोटलीत
तरुणांना का होतो स्ट्रेस बत्तिशित
मरतात कसे सुखासीन असताना
हार्ट Dॉटॅकने धडधडीत…
ही कसली नवीच रीत?
सहजासहजी थोडीच आलाय नशिबी जन्मजाळ
बिलियन शुक्रजंतू, एकच टाकसाळ…
बाहेर येताच काळाचा रुजला स्पर्श
नश्र्वराचा फुलला अंश
जेथे जेथे जाई वंश
तिथवर काळजीचा दंश…
काळ धावतोय सुस्साट-
अंतरपाट
जक्ख खाट
कालिघाट
दरम्यानच्या अंतरात
उभा मायेचे गीत गात..
इथे तिथे सोशल खिडक्या
आडव्या तिडव्या जवळिकीच्या
बॉस उभा फुलवून पिसारा
परफॉर्म परफॉर्म नाच रे मोरा…
एक तारखेचा तोरा
मंथेंडपर्यंत उतरतो पुरा…
क्वार्टर मीट
मिट्ट अप्रेजल
संडेला थोडा साफ करून जोडा
झोपला तो संपला…
करमणूक म्हणून नको सिनेमा
कडेकोट झोपेला दृष्यांचा एनिमा
नशेत तरी मेंदू खुला
चांद झुला निर्विचाराचा
बसल्या बसल्या वर्क फ्रॉम होम
शेजारी नवाकोरा मुलगा झाला
स्पर्शही न करता
हाताशी आला
झाला मुलगा त्याला
बाप म्हणे ना बापाला
खुद््गर्ज साला!
पफ बाय पफ
सैल होते आतले रफ
सोडवता येत नाही
अडवता येत नाही
आईच्या फोनसारखे
आत साचत राहते टार
जे करू शकते बिमार
खूप बिमार
तरी सुटता सुटेना गुंता
सुट्ट्याचा
एखादा वरिष्ठ दिमाग से पैदल
फालतूमध्ये ऑफिसात आईबाप काढल
हा कुढेल,
बाप का दादा का बदला लेगा पैâजल
म्हणून राहील जगत
बुजत राहतील खाड्या
सुकत जाईल ऑफिसमागची दलदल
घाटकोपरला नऊ बाराची खोपोली भेटल
तरच आजचा ऑग्र्याजम आपल्याला झेपल
म्हणत पुरवेल
मुलाधारातले फ्युुएल!
बत्तिशी येईस्तोवर
एक तर जगणे झाट
नाहीतर झाट जगलो आपण
ह्याने हृदय भुईसपाट
बत्तिशीत येईल हार्ट अॅटॅक
कारण
बत्तिशी उघडून ना हसता येतंय
ना बत्तिशी उघडून येतंय बोलता
टांग पुन्हा उलटा
नव्या गर्भात!
शांतता हवी होती
व्हर्जिन कडेकोट शांतता
बेडरूमचे दार लावून घेतले
वॉशिंग मशीन गडगडत होते
बंद केले
टीवी बंद केला
प्रâीज जिवंत होता
त्याची पिन काढली
मग म्हटलं फ्युजच काढू
वरच्याचा मुलगा स्टूल आपटत होता
बाळाला आंघोळ घातली जात होती कुठेतरी
खाली एकाने पंखा लावला
माझ्या स्लॅबमध्ये रुतलेला
आणि आपण स्वतंत्र आहोत एकमेकांपासून
काहीही म्हणतात चुतीये
म्हणत, आजूबाजूला फोनाफोनी केली
शांतता राखा म्हणालो,
त्यांनी सांगितलं तुम तुम्हारा देखो
इतकाच होतोय जर त्रास तर कशाला आलास माणसात?
मग लक्षात आलं आजुला
एक लेखक राहतो
तोही खरखर खर्खर लिहीत असतो वहीवर
बॅग भरली
सरळ विदर्भ पकडली
गावी गेलो
शहरापेक्षा कमी असतो तिथं आवाज
तिथे पोहोचलो तर
गावाला शहर व्हायचं असल्याने
तिकडे होता डेव्हलपमेंटचा आवाज
खाटखाट बनत होते बंगले
खणल्या जात होत्या विहिरी
म्हणून एकाने सांगितले चालतोय का शेतावर?
शेतात आलो,
लिंबाखली गच्च सावलीत बसलो
इथे पानांची सळसळ
गायीचे हंबरणे वगैरे
सुरू होत असताना
दूरवरून एक वरात जात होती,
मग ट्रेन गेली,
मुंजसुद्धा असणार होतीच कधीतरी
आत्ता वरात जाते आहे म्हटल्यावर
सालदार म्हणाला
दादा,
हे गावात वाजिवतात
आणि जंगलं गाजिवतात
गावात मावेना आहेत गावाचे आवाज
लोकांची मने लीक होतात
कृत्या खूप घडतात
सांडत राहतात नाद पडसाद
वैतागलो,
जेंव्हा वरून विमान गेले
हे असे तर कधीच नसणारे आपल्या ताब्यात
एकही मानवनिर्मित आवाजाबिगर जगणे…
आपण मुक्तीसाठी आवाज उठवू शकतो
पण ध्वनीनपासून नाहीचोत मुक्त…
शांतता व्हर्जिन नाही कुठेच
म्हणून वैतागून कान केले बंद
आता मला माझ्याच कानात
येतोय माझ्याच रक्ताभिसरणाचा
अद्भुत आवाज..
आता हा मानवनिर्मित आहे
की नाही
ह्या प्रश्नाचा आहे धुमावूâळ सुरू झालेला
मनात…
राँग – टा
ज्या मित्राला फोन लावायचा होता
त्या नावाच्या दुसऱ्याच माणसाला चुवूâन लागला फोन
काहीच ऐवूâ येत नव्हते
कट झाला फोन
ज्याला कॉल करायचा होता
त्याला जेंव्हा कॉल लागला
तेंव्हा आधी ज्याला चुवूâन केले डायल
त्याचा फोन वेटिंग..
त्यामुळे ज्याला फोन करायचा होता
तो काय बोलत राहिला
मुद्दलात काहीच कळालं नाही
म्हणून घाईघाईत फोन ठेवून
गैरसमज दूर करण्यासाठी
पुन्हा पहिल्या व्यक्तीला लावला फोन
हे सांगायला की चुवूâन लागला फोन!
आपण कधीतरी भेटलो होतो
पण आता मला तुझ्याशी नव्हतेच काम
तुझ्याच नावाची दुसरी एक व्यक्ती आहे आता
फोनबुकात,
तर हा राँग नंबर लागला म्हणून सेटल करू अकाऊंट…
हे ऐवूâन चुवूâन फोन लागलेला व्यक्ती म्हणाला
तुम्ही कोण बोलताय मला माहीत नाही
आधी ज्याच्याकडे हा नंबर होता
असेल तो तुमच्या ओळखीचा पण आता,
मेलाय तो
आता हा नंबर माझ्याकडे असतो
पण तुम्ही चुवूâन तुमच्या ओळखीचा समजून
मला लावला फोन
तो ओळखीचा मी नाही
म्हणून हा आहे डब्बल राँग नंबर
पण त्याच्या डबल राँग असण्याने तुमच्या जीवनात एक करेक्शन तर झाले,
तुमचे फोन बुक दुरुस्त झाले!
हे बोलणे सुरू असताना
जेंव्हा अर्धवट बोलून कट केलेल्या मित्राचा
येऊ घातला फोन
मला जाणवले की
त्यालाही मी न जाणारा वेळ भरून काढण्याकरिता
केला होता फोन
त्यामागे निमित्त होते का?
की नव्हते?
आठवत नव्हते आता.
जेंव्हा फोन सतत वाजत होता,
कोण कुठे उभे आहे
ह्याचं अधिष्ठानच
मला सापडत नव्हतं.
ेैaज्१७१७५३ॅुस्aग्त्.म्दस्