Praveen Akkanavaru
बगीच्यातला गांडू

कोलाहलाचे हुबेहूब नोटेशन्स टिपणारे

काही प्रतिभावंत

कलम होत्साती जिवंत गात्रं चितारणारे

होतकरू कुंचले

मातीचा श्वास गुदमरवत विहरणारी

निरागस पावलं

भाल्यावर शीर खोचून तरारलेले

अस्मितांचे ताटवे

रक्ताच्या कारंजाभोवती निनादणाऱ्या

मुबलक टाळ्या

पानगळीत बहाव्याखाली साचलेला

अवयवांचा खच

बगीच्यात रक्तहीन कोपरा धुंडाळत राहणारा

एकमेव गांडू –प्रवीण अक्कानवरू

 

समकाल

क्रयशक्तीची मापं ओलांडत

सुखं विकत घेताना

कॉम्बोपॅकमध्ये आपसूक येणाऱ्या

भेसळलेल्या, कालसुसंगत निराशेचं काय करायचं?

उठवळ सुखदु:खाचे तमाशे

पोटातल्या निर्विकार अवकाशाचा परीघ

रुंदावत असतानाही

चकचकीत धोपटमार्गावर

दत्त म्हणून उभी असलेली

अड्रेनलाइन, डोपामाइनची चिवट पिशाच्चं

बदलू देत नाहीत सुखावत राहणारी लेन

सहजासहजी

आरशात स्वत:लाच न ओळखण्याइतपत

अनुवूâलन साधूनही

मिसफिट वाटत राहण्याच्या

चिरंजीव जखमेचं काय करायचं?

दरवर्षी नवी पिढी दाखल होतेय

स्थिरावू पाहणाऱ्या नवजात मूल्यांच्या

ठिकऱ्या उडवण्याच्या जन्मजात इर्षेने

कालच्या अस्तित्वाची लाज वाटेस्तोवर

आजविषयीची मूर्तिमंत घृणा उभी राहतेय

धूसर स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर

या उंबरठ्यावरच कसाबसा तोल सावरत

धुंडाळत राहतो मग केविलवाणेपणाने

कालच्या आणि उद्याच्या पिढ्यांना

माझ्याशी जोडणारी ती अदृश्य नाळ

साला, समकाल कमालीचा संकुचित झालाय! –प्रवीण अक्कानवरू

सिगारेट आणि ती

मी सिगारेट शिलगावताच

तिच्या बोल्ड, रोमन फाँटातल्या नाकाने

घेतले अपेक्षित इटालिक वळण

ती सांगत बसत नाही आताशा

निकोटिनचे दुष्परिणाम अन्

फुप्पुâसाची होणारी दैना

केव्हाच सोडून दिलंय तिनं

माझ्यातल्या मुलाला संस्काराचे धडे देणं

‘आई नाही व्हायचंय मला आई होण्याआधीच’

यावर मी टिचकीने राख उडवत दिली होती

मनसोक्त दाद

धारदार नाकाच्या कर्कटकी टोकाने

लावते पूर्णविराम ती आजकाल

अशा असंख्य निष्फळ संवादावर

खरंतर शांततेची अवतरणंच उधळत असतो

आजकाल आम्ही एकमेकांवर

अधोगामी धुराने माझ्या चेहऱ्यावर साधलेला ऊध्र्वगामी परिणाम

टिपत राहते मात्र ती झापड विसरल्या डोळ्यांनी

चेहऱ्यावर मी पेâकलेल्या वलयांना निग्रहाने कापत

सहजीवनाने ओलांडलंय शैशवाचं माप कधीच

पोक्त पौगंडागत अर्क झिरपलाय नात्याचा एकमेकांत

गुणांची अबोल तारीफ अन् अवगुणांशी झालीय संधी केव्हांच

अन् मनामनातल्या दंगलींचा वणवाही शांतावलाय आताशा

संपत आलेल्या सिगारेटीच्या साक्षीने आम्ही

पाहतो एकमेकांकडे पुन्हा एकदा

जगण्याचं थोटूक उरण्याआधी

निरपेक्ष निरोपाच्या,

अन् विनासायास विझण्याच्या

निखळ आणाभाका असतात त्या दोन्ही नजरांत –प्रवीण अक्कानवरू

केऑटिक

गाय व्याली

संस्कृती जन्मली

मिठाळ लोकशाही

दुधात बुडाली

कबरीत आपल्या

हसला ऑरवेल

डिस्टोपिक डिस्टोपिक

राजा बरळला

मंत्री गरळला

विखाराचा चेंडू

घरभर फिरला

जिभा हासडल्या

हरखली प्रजा

हिप्नॉटिक हिप्नॉटिक

ताठरले लिंग

सत्याचे गुप्तांग

समरसून वाहिला

अमानवी रंग

क्लांत सत्याला

स्मरला खुसरो

रोमँटिक रोमँटिक

खुंटल्या गळ्या

कितीएक कानठळ्या

माजल्या भवताली

मुक्या आरोळ्या

कोलाहलाला पुरून

उरतेय शांतता

केऑटिक केऑटिक –प्रवीण अक्कानवरू

कोंडी

मागे दूर क्षितिजावर राहिलेले गाव

आणि समोर शहराचे मृगजळ

दरम्यानच्या निनावी प्रवासातली अघोरी दमछाक

गाव आपलं म्हणत नाही

शहर आपलंसं वाटत नाही

सांस्कृतिक पोरकेपणाची नाळ शोधत राहते मग

स्वत:चंच मूळ परिवर्तनाच्या अथांग निर्वातात

पण हाती काय लागतंय?

अवकाशातील काहीएक भाग व्यापणाऱ्या घराच्या गॅलरीतून

शहर तोंडी लावत लावत ओरपलेले

बीभत्स नॉस्टेल्जियाचे भुरके

ग्लोबल अपरिहार्यतेला पडणारी

सदोष सुखाची लोकल स्वप्नं

आणि

चौकटीविना फडफडणाऱ्या चित्रागत अधांतरी लोम्बकळताना

चौकटीच्या प्रारब्धाची खिल्ली उडवण्याचा

निगरगट्ट दांभिकपणा

हे द्वैत संपायला हवे

ही कोंडी फुटायला हवी –प्रवीण अक्कानवरू

शेजारी झोपलेला माणूस

हा शेजारी झोपलेला माणूस मरेल

या भीतीचा काळोख भरून राहतोय आताशा दर रात्री

झोपेचा घातांक वाढत जाऊन मृत्यूला टेकला तर?

कुणी सांगावं?

भेदरून मग मी तपासत राहतो उच्छ्वासांचे अस्तित्व

नाकपुडीजवळ हात नेऊन

वर खाली होत राहणाऱ्या उराची आवर्तनं

जोखत राहतो तासन्तास

कातडीचा थंडगार स्पर्श कल्पून शहारतो मनोमन अन्

ताठरलेल्या हाडांच्या विचाराने आक्रसून जातो आतल्याआत

भणंग प्रहरी भिववते स्वप्न टिटवीच्या आवाजाचे

सर्द शिरशिरी हाडांतूनि मग, दिसता थवे गिधाडांचे

तसं मृत्यूने छळलंय आधीही,

मिशी फुटतानाच्या वैचारिक गोंधळाने करणी केलेल्या वयात

कल्पिलेत असंख्य मृत्यू असंख्यवेळा

स्वत:चे, आप्तांचे, मित्रांचे, आईबापांचेही

जोखड आणि लोढण्याचं प्राक्तन असणाNयांनी मरून जावं चुटकीसरशी

बाळगलाय हा नीच आशावादही, दिवसेंदिवस

पण आता जीव घाबरा होतो, कारण,

ह्या शेजारी झोपलेल्या माणसाने बांधल्या आहेत आतड्यांच्या निरगाठी,

ओतलं आहे असं काहीसं आत ज्याची नव्हती सवय कधीच माझ्या पिंडाला,

त्याच्या मुळातूनच तर उगवलंय हे अनोळखी देखणेपण माझ्यात,

तोच तर वाहतोय उष्ण उष्ण, कातडीखालून सदोदित

म्हणूनच, ह्या शेजारी झोपलेल्या माणसाने मरू नये माझ्याआधी, अन्यथा,

कोसळेल धूमकेतू काळजाच्या खोबणीत,

मिळेल उमेद अनिर्बंध दिशाहीनतेला,

हरवेल पुन्हा एकदा, गवसलेलं अनाकलनीय ते

त्याच्याहूनही अधिकसं, मरेल माझ्यातच काहीतरी

पेलवणार नाही माझ्याच्याने,

शेजेवरची त्याची रिकामी जागा भरून काढू बघणारं

इतवंâ सारं सारं दु:ख –प्रवीण अक्कानवरू

ठिणगी

पूर्वनियोजित कटाप्रमाणे जेव्हा

अवचित फुटलेल्या सहस्र बाहूंनी

गोठलेल्या रात्रीतला अंधार सर्वशक्तीrनिशी माझा

गळा आवळत असतो,

माझ्या श्वासांच्या काऊंटडाऊनवर

काळोखे निरभ्र आभाळ

डोळे मिचकावीत मटका लावत असते,

जेव्हा नवनव्या ताग्यातून काढलेल्या

संकटांच्या वावटळींनी

माझ्या जगण्याचा सेल मांडलेला असतो

तेव्हा तथाकथित स्थैर्याच्या कित्येक

स्वयंप्रकाशित उत्कलनबिंदूंनी

तो भयाण अंधार उजळून निघतो

असह्य त्या बीभत्स प्रकाशात

लहानखुरा होत जातो मग मी

माझ्या नजरेसही दिसेनासा होईस्तोवर

माझ्या य:कश्चित कुडीकडे पाहून

जेव्हा पिंगा घालणाऱ्या त्या सहस्रावधी

यशस्वी नजरांत आत्मतृप्तीचे दिवे पेटतात

तेव्हा मात्र माझ्या काळरात्रीला

पहाटेची किनार लाभते

सूर्य होण्याचे स्वप्न उरात घेऊन

एक ठिणगी अवचित उमलत राहते

आतल्याआत,

माझ्याही नकळत –प्रवीण अक्कानवरू

प्लास्टिक

त्वचेत वितळलेलं प्लास्टिक

आवंâठ धूर धूर

मायमोहाच्या दिवंगत चिमण्या

आक्रोशतायेत संदिग्ध तावदानांवर

वाट चुकल्या नदीला स्मरतात

गतकाळातली ओली आवर्तनं

बर्फाळ प्रेतांवरही उमटतोय घाम

भाकीतांच्या अविरत काहिलीने

रक्तांत साकळलेलं प्लास्टिक

वैफल्याचा फुलतोय अंगारमळा

मीठपेरल्या मातीत मात्र कशी कोण जाणे

समूळ तग धरून आहेत, गरकोषातली सर्द गुपितं

रात्रीत डवरून येणाऱ्या फुलोऱ्याला

पडत नाहीत स्वप्नं पहाटेची

सांध्यांतून निखळलेली अंतिम इच्छाही

आठवतेय आता चवीपुरती केवळ

श्वासांत विरघळलेलं प्लास्टिक

कडवट अवघी देहधून

अन्नसाखळीतूनही होतंय फक्त

पोकळीचं हस्तांतरण

देठाला ठरवून लावलेल्या नखाच्या

स्मृती, कुरतडत नाहीत अजूनही मनाला

कुंदसावळ्या पदराखाली फुटतोय पान्हा

कांगाव्याखाली घुसमटतंय हिरवं सौष्ठव

रोजच्यारोज

स्मृतींत कोरलेलं प्लास्टिक

अमरत्वाची जन्मखून चोख

कोऱ्या आवृत्या अस्तित्वाच्या

वाढवतायेत इथली निष्फळ गर्दी केवळ

जगबुडीच्या खऱ्याखुऱ्या दंतकथेत लपलाय म्हणे

अनंतपेâरा कित्येक थकवणाऱ्या मुळारंभांचा

भ्रम फाटका बैरागी तरीही गातच राहतो

उद्धारची तीच ती, कालविसंगत,

वांझोटी गाणी.

अशाच एका क्लिकबेटावर

अशाच एका क्लिकबेटावर

सापडतील पोरक्या घटनांचे सांगाडे

माहितीच्या अजागळ दलदलीत तगलेले चुकार प्रसंग

भटकत असतील

कधी कुणी न ऐकलेल्या कहाण्या

तिथल्या आदिम झाडांना सुनावत

न्यायाची चव ठाऊक नसलेले अतृप्त आत्मे

होत असतील कासावीस समुद्राच्या मधोमध

जन्मभराची तहान घेऊन

अशाच एका क्लिकबेटावर

गर्द काळोख्या रात्री

जमत असेल अनावृत्त भावनांचं टोळवंâ

चेतवणाऱ्या शब्दांची होळी करण्यास्तव

देहाविलग झालेल्या आरोपीच्या पिंजऱ्यातल्या जिवंत जिभा

वाचत असतील गतकाळातल्या अनुल्लेखांचा पाढा

निरंतर –प्रवीण अक्कानवरू

अशाच एका क्लिकबेटावर

साचली असतील अश्रूंची धीरोदात्त डबकी बेहद्द

कण्हणाऱ्या दु:खाच्या आवर्तनांत फिके पडत असतील

तिथल्या सैरभैर घुबडांचे आवाज

तळतळाटांचं माजलेलं तण जुमानत नसेल

सुलतानी आपत्तींच्या पोकळ धमक्यांना

याउपर

अशाच एका क्लिकबेटावर

खडकांच्या खोल कपारीत

गुडघामिठी घालून बसलं असेल भेदरलेलं सत्य

मध्ये मध्ये मान उंचावून चाचपत असेल खळाळ किनारा

स्वत:च्या निखळणाऱ्या हाडांनी वाळूत रचलेल्या

‘प्Eथ्झ्’च्या भरवशावर

लांबवत असेल पुढ्यातला शाश्वत मृत्यू

कदाचित  –प्रवीण अक्कानवरू

तू कविता लिहीच

गळ्यापर्यंत आलेल्या अस्वस्थतेला नख लागण्याआधी

तू कविता लिहीच

चिखलात लदबदलेली पावलं कायमची रुतण्याआधी

उमटू दे त्यांचे जिवंत ठसे नितांतशुभ्र कागदावर

अनुभूतीच्या वाळवंटात तगलेल्या चुकार वेलीला

शेवटच्या आचक्याआधी लपेटून घे लेखणीभोवती,

वासनेच्या उफ़ाळत्या लाव्हात तुझी वाफ होण्याआधी

स्रवत रहा शब्दांवाटे, रिता हो अवघा

स्वत:च्या सुटकेच्या स्वार्थापलीकडे मात्र,

मागू नकोस तिच्याकडे काहीही,

कवितेखाली स्वत:ला गाडून घेऊन मोकळा श्वास घेणारा

तू काही पहिलाच नाहीस,

तुझ्या कवितेत उगवून येणारं सत्यही काही अंतिम नसेल.

ज्ेa१८८८ॅुस्aग्त्.म्दस् –प्रवीण अक्कानवरू