निरर्थक प्रवास
कुणालाच भेटण्याची ओढ नाही.
वूâणीही वाट पाहात नाहीए
नुसतेच हेलकावे संथ गतीचे
अंतरा-अंतरावरची बाभूळ सागाची एकएकटी झाडं मागे पडतात
धिम्या गतीनं
पिवळी उजाड क्वचित हिरवी
शेतं पळत राहातात बांधासह
प्रवासाच्या उलट्या दिशेने
या कडुनिंबाच्या झाडाला
कुणी बांधून ठेवलीय
इच्छांची गाठोडी?
कडुनिंब झुलतोय निरर्थक
मन्नतीच्या चिंध्या अंगावर घेऊन
थंडीच्या दिवसात
रस्त्यावरचा फुफाटा पांघरून
श्वास कोंडून घेतलाय
या लेकुरवाळ्या पपईने
नखशिखांत.
पाना फुला फळांसहिrत
आणि एक नवती सासुरवाशीन
बसून आहे व्दिमुढ न बोलता
म्हाताऱ्या वडिलांसोबत
बसची वाट पाहात.
काय वाढून ठेवलं असेल पुढे
सासरी गेल्यावर?
या काळजीत झुरत.
शेंदराने फासलेले एकाकी देव
एक एकटेच बसलेत दूर दूर
विस्तीर्ण गवताळ मैदानात
त्यांना वेगाने मागे सारत
प्रवास धावतोय नुसताच
निरर्थक प्रवासातली जीवघेणी वळणे आणि वेळखाऊ थांबेही
तगमगवत नाहीत मनाला
नेहेमीसारखे.
कुठे काय फरक पडतो?
आधी पोचलो किंवा नंतर
वाट पाहणारं नसतं कोणी
या निरर्थक प्रवासात
आणि ओढही नसते अनिवार कुणाची
जुने नांगराचे फाळ अन्
मोडून पडलेल्या बैलगाड्या
बैलासह खोपटात टावूâन
ट्रॅक्टराचं तीक्ष्ण लोखंड
उकरत असतं काळ्या मातीचं काळीज.
रस्ता रुंदीकरणात उपटून टाकलेल्या विशालकाय वृक्षांची आडवी खोडं
निपचित पडलेली वाळत
मुळांची बोटं आकाशाकडे वळवून
पालवी फुटण्याची दुवा मागत
पिवंâ काढून नेलेली
उघडी वाळली रानं
धावत राहातात
प्रवासाच्या गतीशी स्पर्धा करत.
पक्व झालेल्या हळदीच्या खोंबांची
कडाकडांनी वाळलेली पानं
काढणीची वाट बघत
ताटकळत असतात निरर्थक
प्रवास निरर्थक असला तरी…
तुझाच चेहेरा असतो
डबडबत्या डोळ्यांत
ओघळून वाहून जाऊ नये म्हणून
अश्रूंना आवर घालत
कुठल्यातरी थांब्यावर
प्रवासातून उतरलेल्या
चार बुरखेधारी बायका
आमेनसाठी हात उचलतात
आजानच्या सुरावर
तिथल्या तिथेच
तेंव्हा त्यांची दुवा
मुक्कमल होण्याची
प्रार्थना करते मी मनातल्या मनात.
मुक्काम नसलेल्या या निरर्थक प्रवासातूनही मला उतरायचंय तिथे
जिथे तू उभा असशील बाहू पसरून
माझा अख्खा प्रवास कवेत घेण्यासाठी.
लाज वाटते मला एका निर्घृण निर्दयी राक्षसी देशात राहण्याची.
लेकीच्या वाढदिवशी
सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट
मी काढून घेते तात्काळ
चटका लागल्यासारखी.
खूप मागे मागे जात
सगळ्या निरागस पोरींचे फोटो
हाईड करत राहते मी
सगळ्या आयांच्या पेâसबुक टाइमलाइनवरून.
मी शोधत राहते बोटांनी
कधी कुठे काय बोललेय,
लिहिलेय का प्रस्थापितांच्या, सत्तेच्या, परंपरेच्या विरोधात
पुसटसंही काही.
मी डिलिटत राहते ट्विटर,
इन्स्टा, टेलिग्राम, हाईकवरचं
माझं सगळं अस्तित्व.
मी परत बोलवते पृथ्वीवरच्या सगळ्या खळाळत्या पोरींना माझ्या गर्भाशयात
आणि अधिकच आकसत जाते मी
हात पाय डोवंâ पोटाशी घेऊन
माझ्याच आत आत…
आता
आमचा स्पायनल कॉड तोडून
जीभ कधीही छाटली जाऊ शकते
या निर्दयी देशात.
स्ट्रेचमार्कस्
तिरक्या नागमोडी रेषा
हे थुलथुलीत लिबलिबित
शिथिल ओटीपोट
हे सिझेरीयने कापून
शिवलेले सात अस्तर
जगातल्या कुठल्याही वंâपनीने
बनवू नये ह्या खुणा घालवण्याचं औषध
जगातल्या कुठल्याही वंâपनीने
बनवू नये ह्या रेषा लपवणारं क्रिम
आम्ही मिरवू ह्या खुणा पोटभर
पांढऱ्या वाकड्या तिकड्या
तिरक्या नागमोडी
विनासंकोच उघड्यावर
दुग्धपान करवू बाळाला बिनदिक्कत
नकोय आम्हाला हिरकणी कक्ष
आम्ही जन्माला घालू
स्त्री पुरुष किंवा तृतीय
तुमच्या परवानगीशिवाय
अथवा
शिवून टावूâ गर्भाशय तसंच
काहीच न प्रसवता
मिरवत राहू कोरं करकरीत पोट
अथवा ह्या पांढऱ्या वाकड्या तिकड्या
तिरक्या नागमोडी रेषा.
अतिसंवेदनशीलतेचा
शाप असलेले लोक…
अतिसंवेदनशीलतेचा
शाप असलेले लोक
भणभणत राहतात
अस्वस्थ कायम.
ते झोपू शकत नाहीत रात्री
शक्याशक्यतेच्या कल्पित
भासाने भिऊन जाऊन
किंवा अचानक उद््भवलेल्या
समस्येशी दोन हात
करता न येऊन
ते अस्वस्थ राहतात संध्याकाळी
दिवस संपून चाल्लाय आजचा
या भीतीने.
ते अस्वस्थ असतात दुपारीही
दैनंदिन कामं होत नाहीयेत
मनासारखी म्हणून
पहाटे पहाटेही
विमनस्कच बसलेले असतात ते
रात्रभर डोळ्याला डोळा
लागला नाही म्हणून.
प्रत्येक गोष्टी घटनेविषयी
व्यथित होणारे हे
‘जीणं’ च ‘हराम’
करून घेतात आपलं
तगमग ओसंडत असतात
आत बाहेर दिवसरात्र
अतिसंवेदनशीलतेचा
शाप असलेले लोक
त्यांना सोडवता येत नाही
नात्यांचं छक्केपंजी राजकारण
लिहून बोलून रडून
हसूनही होता येत नाही रितं
अन् या शापातून मुक्तही
नाहीच येत होता
ते भणभणत असतात
अस्वस्थ. कायम.
ते कायम अस्वस्थच असतात
भणभणते लोक.
मूर्खअडाणी येडपट बायका
तुम्ही तरणे असा वा म्हातारे
विद्रूप असा वा राजबिंडे
काटकुळे, जाडे, बुटके,
टकले अथवा सर्वांगावर केस असलेले अस्वल नाहीतर माकडासारखे…
नकटे, चपटे, देखणे,
काळे, गोरे, उंच
कसेही असा तुम्ही…
तुम्हाला धरून राहतात आयुष्यभर
मूर्खअडाणी येडपट बायका
तुम्हाला ताप येवो
वा हार्ट अॅटॅक
जुलाब होवो वा वांत्या
ऊन लागो वा चक्कर येवो…
आहे त्या अवस्थेत धावत पळत जातात
ओचे वर खोचून अनवाणी पायांनी
मदत मागायला किंवा डॉक्टर बोलवायला..
धडपडत जातात
मूर्खअडाणी येडपट बायका
तू एक नंबरची धांदरट
नालायक आहेस.
काहीच कळत नाही तुला
अक्कल शिकवू नकोस
वा पाजळूही नकोस..
दिवसभर झोपा काढतेस आळशी
तुम्ही द्याल तेवढा ओरडा खातात…
कधी लाथा कधी बुक्क्या
तरी
तुम्हाला सोडून हलत नाहीत त्या
चिकटून राहातात गोचिडासारख्या
मूर्खअडाणी येडपट बायका
तुम्ही ऑफिसातून चिडून या
किंवा मजुरीने थवूâन
दारू पिऊन वा गांजा ओढून
अफीम- चरस- ड्रग् सिगारेट,
वा बिड्या ओढून
तुमच्या सेवेला तत्पर असतात
रात्री अपरात्री दिवसाढवळ्या
पाय पसरून अंथरून होतात..
मूर्खअडाणी येडपट बायका
थवूâन जातात पिचून जातात
झिजून झिजून बारीक होतात
हजारवेळा मरून जातात तरी
तुमच्या नावाचं सवाष्णपण
मिरवत राहातात आयुष्यभर
मूर्खअडाणी येडपट बायका
तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा
किंवा नका करू
बाहेर अपेâअर करा वा लफडं
वेळी अवेळी बाहेर पडा…
सांगून जा अथवा नका सांगू
तुमचं घर अबाधितच राहील
आणि संसार सुरळीत…
उपमा सांजा पोह्याचा नाश्ता
मिळत राहील न चुकता…
दोनवेळचं जेवण
चटण्या कोशिंबिरी लोणची पापड…
सण वार पाहुणचार साजूक तूप
इडली ढोकळा दोसा घरचा…
शेवया कुरड्या वड्या सांडगे
वर्षानुवर्षे
काळजी करण्याचं कारण नाही…
व्यवस्थेनी कायम बांधलेल्या असतात तुमच्या पायाशी…
मूर्खअडाणी येडपट बायका
शूचिर्भूत
भल्या पहाटे उठून
कामाला लागतात बाया
घरं झाडतात,
अंगणं झाडतात
पाणी शिंपतात
फरश्या पुसतात
रांगोळ्या काढतात…
शूचिर्भूत,’शिर:स्नात’ होऊन
देवपूजेसाठी फुलं आणायला
जातात बाया आजूबाजूला.
एकमेकींच्या अंगणाशी,
कामाशी स्पर्धा करतात बाया…
आपलं काम तिच्या आधी झालं
म्हणून खूश होतात आपल्या गृहिणीपणाच्या दक्षतेवर
मनोमन…
न झाडलेल्या अंगणाला,
बंद दरवाज्याला
नावं ठेवतात बाया…
जास्त वेळ झोपून राहणारीला…
कामं टावूâन मॉर्निंगवॉकला जाणारीला
सकाळी सकाळी पेपर पुस्तक वाचत बसलेल्या पारोश्या बाईचा
दु:स्वास करतात
‘शिर:स्नात’ शुचिर्भूत बाया..
दूषणं देत राहातात…
वेळ मिळाला की चारचौघीत.
उणावत दुणावत राहतात
मुक्ततेकडे वळू पाहणाऱ्या
बायांतल्या माणूसपणाला
बांध घालू पाहतात बाया…
स्वत:चं बाईपण आधिक
घट्ट करत राहातात…
असुरक्षिततेचं कडं
अधिकाधिक गुंफत
व्यवस्थेनी बांधून दिलेल्या
डोंबार दोरीवर, तोल राखत
चालत राहतात बाया
वर्षानुवर्षे…
पुरुषाचं पुरुषपण ठळक,
अधोरेखित करत राहातात,
नव्या पिढीत झिरपवत राहातात ‘बाईपणा’बाया…
बाईनं बाईपणातून बाहेर
पडायला हवं आता
दोरीवरची कसरत सोडून
पारोश्यातून मुक्त होऊन
आकाशाची पूजा बांधायला हवी
बायांनी पुन्हा एकदा
‘शिर:स्नात’ होऊन….
ही म्हातारी मरून का जात नाही?
प्राणघातक हल्ला केलाय.
कोणीतरी तिच्यावर
किंवा
दोन रुपये नाही मिळाले तर
लगेच मरणार आहे ती
उंच, तार स्वरात किंचाळत
ओरडत
धमकीवजा भीक मागतेय ती प्रत्येक गेटसमोर
देता काय वं बाई वं ऽऽऽऽ
देता काय दोन रुपये ऽऽऽऽ
दे वं बाई वं… देत नायी का..य?
काय चा सूर शक्य तितका लांबवत
द्या वं बाई लवकर…
किंचाळत राहते जोरात
क्षणाचीही उसंत न घेता
देत राहते
एकावर एक ता..र हाका
दिलेच कुणी दोन रुपये
पाच रुपये तर
प्यायला पाणी आणि खायला मागते हक्काने.
ठिय्या मांडून बसून राहते
दुर्लक्ष करणाऱ्या घरासमोर किंचाळत ओरडत
देता काय वं…?
जाऊ द्या मले पटकन
ओ बाई वं…
बयऱ्या झाल्या काय वं…?
जाऊ काय मंग मी…?
ओ बाई वं ऽऽऽऽ
झोपल्या काय वं घरात…?
जाऊ काय मी…?
म्हणत हलत नाही जागची
गारगोटीसारखा
एक पिंगट, अर्धवट डोळा,
जीर्ण पडझड झालेले दात
उभी काठी हातात धरून
काठी होऊन गच्च
बसून राहते म्हातारी
किंचाळणं जराही कमी न करता
दारं लावून घेते भयाने
शांत सोज्वळ कॉलनी
घरातल्या घरात चिडिचुप्प
आवाज न देता निग्रहाने
बराच वेळ पिच्छा पुरवून
उठू लागते हळूहळू
चाल्ली वं मी…
जाऊ का..य?
ओ बाई वं…
बापझयीच्या
दरवाजा उघळून नायी रायल्या
बयऱ्या वाणाच्या… पुटपुटत
चालत राहते हळूहळू
पुन्हा नव्या गेटसमोर
नव्या आशेने ओरडायला
सरकत राहते हळूहळू
अर्धी वाकलेली, फाटकी,
अधू म्हातारी
मुलगा सून नातवंडासकट
भीक देणाऱ्या न देणाऱ्या
सकळ कॉलनीला शापत राहते
वैतागलेली संतापी
वृद्ध भयाण म्हातारी
आरोळ्या देते फिरत राहते
तास दीडतास
शांत कॉलनी डिस्टरबत राहते
बेशरम दुष्ट म्हातारी
काल पैसे दिले तरी…
विसरून किंवा जाणूनबुजून
आशेने, पुन्हा त्याच दारात
रोज रोज किंचाळत राहते
जिद्दी चिवट चिकट म्हातारी
शांत कॉलनीतले सुशिक्षित लोक घाबरतात तिला
तिच्या शिव्या आणि
भेसूर ओरडण्याला
दर आठ दिवसांनी
पंधरा दिवसांनी
कधी रोज रोज
नित्यनेमाने येणारी
ही म्हातारी
मरून का जात नाही..?
काय उपयोग तिचा कुणाला?
घरचे बाहेरचे हाडतुड करतात, शिव्या देतात,
पुरुष माणसे हाकलून लावतात
म्हणून निवांत सुखासीन
निवांत पहुडलेल्या दुपारला आळसावलेल्या आरामाला
रोज उठवत येते
चिवट, खवचट दरिद्री म्हातारी
शिकल्या सवरल्या सुखी
समाजाला त्रास देत
सर्दी, खोकला, डेंगू, मलेरिया,
टाईफाईडवर मात करून जिवंत राहिलेली
कुरूप विद्रूप भयानक म्हातारी
कॅन्सर, टीबी, बीपी, शुगरला पायदळी तुडवून पुढे गेलेली
नव्वद वर्षांची ही
पिशाच्च म्हातारी
खरंच
मरून का जात नाही?
सुगरण
तिला टाळतात
सगळेच जाणीवपूर्वक
घरातले बाहेरचे
शेजारी पै पाहुणे
कामवाल्या, रस्ते झाडणारे
तिला कळत नाही
असं नाही.
तरीही नेटाने
बोलत राहते ती सगळ्यांशी
लागटपणे खूप घडाघडा
उत्साहात.
करत राहते रसभरीत वर्णने
घटनांची इतिहासाची सुखदु:खांची.
पुन्हा पुन्हा
मिटलेल्या पुस्तकांची
पाने उलगडत राहते
सगळ्यांसमोर
रोज रोज
वंâटाळतात तिला मुलंही लहान लहान
हसतात टवाळतात कुत्सितात दुर्लक्षितात..
बीपी शुगर हार्ट अॅटॅकच्या
वारांतून वाचलेली ती
बनवत नाही आताशा
चमचमीत खमंग
तेलकट तुपकट काही.
खाऊ शकत नाही
भाजीभाकरी शिवाय काही
तरी.
शेजारच्या पोरी सुनांना
सांगत राहते रेसिपी ती
रसभरीत, तोंडाला पाणी आणत
तिला येणाऱ्या सगळ्या पदार्थाची
रोज रोज
आग्रह करत राहते
करून खाऊ घालण्याचा घरच्यांना…
कधी तरी केलाच कुणी
एखादा पदार्थ तर
फिरत राहते त्यांच्या घराभोवती
काठी टेकवत
त्या वासाने आनंदून
घालत राहते घिरट्या गतकाळात.
कोणी बोलवलंच कधी घरात तर
लंगडत दमत धापा टाकत
चढते पायऱ्या हळूहळू
धन्यता मानते, धन्यवाद देते
खूप मोठा वारसा
चालवायला दिल्याप्रमाणे
कृत्य कृत्य होते स्वत:च.
नुस्त्या वासाने खमंग.
खात नाही काहीच
दोन्ही गोरे मऊशार तळवे
वर करून आशीर्वाद देते
डोळे मोठे करून
हसऱ्या कृतार्थ चेहऱ्याने
कमरेवर हात देत
एका हातात काठी घेऊन
हळूहळू उतरत जाते
पायऱ्या ती खोल खोल
अंधाराच्या तळाशी
अल्लाहू अकबरल्ला
अल्लाहू
अकबरल्ला….
ला.. चा सूर लांबलेला
विशिष्ट लयीत
हू अक् बर शी विशिष्ट थांबा
अशदुअल्ला …आ महं…म्मद रसुलुल्ला..
रोज साडेपाचची तीच वेळ..
आकाश केशरी पिवळं
कधी पांढरट निळं
कधी भरून आलेलं…
अस्वस्थ मनासारखं
गडद
कलत्या दिवसाची
अनामिक हुरहुर..
घालमेलीचा धुरळा उडवत
परतणारे पोपट कावळ्यांचे थवे,
बकऱ्या, गायी म्हशीचे कळप
अस्वस्थ घुंगूरनाद,
दिवसपर्व संपल्याचा
मोकळ्या अंगणात
सुबक विणलेल्या
लाकडी खाटेची
कुठूनशी तुटलेली
नारळाची दोरी
गाठ मारून ठेवण्याच्या प्रयत्नात
गढून गेलेली बोटं अन्
उगाच हळवा होत जाणारा
कातर जीव
क्षितिजावर एकटीच पडून
संपता सूर्य पाहात
ढवळून निघायचं
एकाकी मनाचं तळं
अंय्या लस्सला…चा
टाहो
कारणीभूत ठरायचा
विनाकारण रडण्याला
स्वस्थतेचं कारण
तिन्हीसांजेला शोधतानाच मग…
शेवटचा सोनेरी किरण अंगावर घेत
काठी गुडघ्यात धरून
सोनेरी तांबूस रंगाची
पिकल्या केसांची आजी
दोन्ही हात जोडायची
बुडत्या सूर्याकडे बघत
मनोभावे पुटपुटायची
ओठातल्या ओठांत काही
मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी
आजी शेवटचीच व्यक्ती बहुधा
माझ्या आजपर्यंतच्या पाहण्यातली.
हे चेहरे कुणाचे आहेत?
हे चेहरे कुणाचे आहेत
चेपलेले, दबलेले, पिचलेले?
वर्षांपासून अविरत…
थापडा खाऊन खाऊन
खप्पड झालेले…
हे चेहेरे कुणाचे आहेत
गालच उरले नाहीयेत तिथे
अन्
दातांची पडझड झालेले
हे चेहरे कुणाचे आहेत?
कित्येक वर्षे झालीत
बोलल्या नाहीत ह्या जिव्हा…
ना सत्तेच्या विरोधात
ना स्वत:च्या बाजूने
गपगुमान पडलेल्या
निमूट, मुकाट
पडून असलेल्या
मुक्या जिव्हांचे
हे चेहेरे कुणाचे आहेत?
बोलायला ओरडायला आक्रोशायला..
शब्द उच्चारायला तरी.
ओठ हवेत ना शिल्लक
पघळून गेलेयत ते कधीचे..
घट्ट चिकटलेयत एकमेकांना
त्यांना उरली नाही सवय
उघडायची हलायची
पघळून चिकटलेल्या ओठांचे
हे चेहेरे कुणाचे आहेत
हे कान,
हे नाक,
हे डोळे,
हे ओठ
दबत चाललेयत
आतल्या आत
एकमेकांत मिसळत
हे पितळी,
लोखंडी,
तांबे,
जर्मन,
आल्युमिनियमी
अबोल, बहिरे, आंधळे
प्रश्नार्थी चेहरे
कुणाचे आहेत?
जेंव्हा मी विसरून जाइन भाषा…
मी विसरत चाल्लेय
दैनंदिन व्यवहारातले
साधे साधे शब्द
तारखा, दिवस, वार,
नाव, गाव, वस्तू, प्राणी
बोलता बोलता
अडखळते मी खूपदा
‘ते’ ‘ब’ ‘हे’ ‘काय म्हणतात ते’
…. ….. …… ….. …..
काहीतरी खूप महत्त्वाचं सांगता सांगता अचानक नि:शब्द होते मी
कोऱ्या करकरीत पाटीसारखी किंवा
नुसतीच शाई सांडलेल्या
कोऱ्या कागदासारखी
तेंव्हा माझा चेहेरा
फारच विचित्र,
वेडावाकडा होत असावा
असं मला वाटतं
किंवा
भाषा येत, माहीत, आठवत
नसलेल्या निर्बुद्धासारखा
चेहरा घेऊन फिरणं
कसं शक्य असेल मला?
असं वाटून
खूप भीती वाटते मला
मला भीती वाटते
फवत एक निश्चल वस्तू म्हणून
कशी काय जगू शकेन मी?
जेंव्हा,
मी विसरून जाईन शब्द,
विसरून जाईन वाक्य,
विसरून जाईन वाक्प्रचार,
म्हणी, गाणी त्यांच्या चाली,
संगीत-सूर, काळ-वेळ,
मुलं, माणसं, नातेवाईक…
जेंव्हा
मी विसरून जाईन भाषा
तेंव्हा, लोक आठवतील का मला?
किंवा मी लिहिलेल्या
गिचमिड अक्षरांना…?
ेarग्व्aल्ंaत.२६७७ॅुस्aग्त्.म्दस्