येतात
घराच्या खिडक्यांत कबुतरं येतात.
दारात कु रियस.
दुध येतं
मग, न्यूजपेपर्स
हवा थोडी, ऊन येतं,
ते ही आपणहून येतं.
बाई येते. बिल येतं.
लॉण्ड्री येते लोंबत लोंबत.
चपला येतात, चपला जातात.
टीव्हीमधून भुतं येतात.
आठवणी; येस्स. आवाज पण.
ताप येतो, तलफ येते
झोप आली तर जाग येते.
विचार येतात सारखेच.
मित्रं आणि पत्रं रेअरली मात्र.
घरात धूळ, भिंतीवर ओल, कपाटात वाळवी.
नाकात दम, पोटात गोळे,
पायाला मुंग्या, डोक्याला भुंगे.
उंदीर, पाली, माशा, मुंगळे
सगळी सगळी येतात तरी घर नाही भरत.
जात नाही फारसं कोणीच यातलं.
गेलाच तर एखादा माणूस.
मग इतवंâ सग्ळं येऊन सुद्धा घर, घर नाही उरत.
गेलेली माणसं घर असं उद््ध्वस्त करतात जेव्हां
कवितेच्या काड्यांनी घर बांधावंसं वाटतं तेव्हां. –शर्मिला रानडे
कमर्शियल रेप
कवितेची नाडी सैल करत शब्द
घुसवलाय नेम धरत.
हात बांधलेत
बोळे कोंबलेत
जीभ वळवळतीए
डोळे फडफडताएत
पंख्याखाली शब्द बघ वाऱ्यासाठी
तडफडताएत. आवाज दबतोय
दातात लपतोय
वेग कळतोय
शब्द जळतोय
राखेमधून फिनिक्स पक्षी
लंगड्या पायांनीच पळतोय.
सूर धरलाय
बीट तोच ए
खालचा वरचा एकच सा
शब्दांवाचून कुठं अडलंय?
कस्टमरला खूश करत गाणं
अस्ताव्यस्त पडलंय. –शर्मिला रानड
बिलाँग
‘बिलाँग’चा अर्थ डिक्शनरीतून उतरून माझ्यापर्यंत पोहचतच नाही.
तसंच ‘रिलेट’, ‘असोसिएट’, ‘कोऑपरेट’.
ज्यांच्यापर्यंत हे शब्द पोहचतात,
ती लोवंâ ग्लासला ग्लास लावतात.
आणि मांडीला मांडी.
बाकीची
लोवंâ घराची दारं खिडक्या घट्ट बंद करतात.
बाहेरची हवा आत यावी म्हणून उघडी ठेवतात टी.व्ही.ची एक फट
आणि बेल वाजलीच तर ऐवूâ यावी म्हणून फोनची रिंग.
असं एकटं एकटं होत जाताना, शंभर वर्षांनी,
दूर गेलेल्या लोकांची फ़ॉसिल्स होतात
आणि जवळ न येऊ दिलेल्या लोकांचे ..एलियन्स. –शर्मिला रानडे
अंधाराकडे बघणारी माणस
सिटीज्च्या ग्लिट्झ मधून बाहेर पडत
माणसं अंधाराच्या दिशेने जातात.
ती बसतात टक लावून
हातात हात न घेता अंधारात.
ती प्रेमं करत पडू शकतात,
पण करत नाहीत
फक्त सरेंडर करतात स्वत:ला
विळख्यात अंधाराच्या.
जेव्हा नि:शब्दतेचा पाऊस कोसळू लागतो धुंवाधार,
तेव्हा ही माणसं आधार घेतात अंधाराचा
आणि दाखलाही देतात अंधाराचाच.
सिटीजकडे परतताना मात्र अशा माणसांच्या सावल्या स्लो होतात. अंधाराकडे
बघणारी माणसं अंधारातच ग्लो होतात. –शर्मिला रानड
माणसं नावाच्या मुंग्या
आपण असे निधोर्कपणे एकटे बसलेले असतो. मजेत.
तेवढ्यात शेजारी माणसांची मोठ्ठी रांग.
एकासारखे एक. एकच ओळ धरून चाललेले. एकामागून एक.
सरळ का माहीत नाही पण एकमार्गी. मोनोटोनस.
ओळ सोडून बाजूला जायचं, तर गट्स नाहीत.
मग ओळीत नसलेल्या,
मजेत एकटं बसलेल्या मुंगीवर सामूहिक हल्ला.
आपल्यावर चढून येतात, डसतात.
पण आपण काय करणार?
आपण शेवटी मुंगी.
माणसं आपल्या वरचढ असतात. –शर्मिला रानड
पावसात पायाखाली आलेली कविता…
घरी घेऊन आले. आयतीच मिळाली होती. लेबर पेन्सशिवाय.
आय फील होमलेस हिअर
पावसातली कविता घरात येताच म्हणाली. टू ड्राय.
गेट अ कप ऑफ इमोशन्स
आय मे सव्र्हाइव इफ यु
ट्राय.
खूप शोधलं.
बाहर धुवाधार पाऊस.
आत सगळं कोरडं.
इमोशनचा कप शोधत कविता घरभर भटकली.
इतरवेळी जळवेसारखी चिकटते ती,
पावसात पायासारखी सटकली. –शर्मिला रानड
आवरा आवर
तुझ्या इतक्या दिवसांच्या सहवासाने; पोटात खड्डा पडलेला बेड,
खिडकीजवळच्या तुझ्या आवडत्या खुचीर्ची वाकलेली पाठ,
खाली वाट बघत थवूâन उभी असलेली तुझी निळी गाडी
आणि दु:खाने आतल्या आत जळत राहिलेला तुझा पाइप.
आज एक वर्षानंतर सगळ्या गोष्टी जिवंत होऊन बोलतायत माझ्याशी.
थोडं मनमोकळं होऊन. थोडं निर्धास्त होऊन.
त्यांना भीती होती तू गेल्यानंतर होणाऱ्या आवराआवरीची.
सजीव गेल्यानंतर लागणाऱ्या निर्जिवांच्या विल्हेवाटीची
ेप्arस्ग्त्a.raहaॅुस्aग्त्.म्दस् –शर्मिला रानड